वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी सूलनमध्ये चक्क वाचनालय

Foto
औरंगाबाद : आजची पिढी मोबाईलमध्ये अडकलेली असल्याने वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. पुस्तकांशी असलेले नाते तुटत चालले आहे. अशा परिस्थितीत लोकांनी पुस्तकांशी मैत्री करावी या उदेशाने माणुसकी सलुन वाचनालय उघडण्यात आले आहे. हा महाराष्ट्रातील एकमेव आगळा -वेगळा उपक्रम समाजसेवक सुमित पंडीत यांनी सुरू केला आहे.
उदरनिर्वाहसाठी केशकर्तनाचा व्यवसाय करणारे सुमित पंडीत हे आपल्या समाजसेवेसाठीही ओळखले जातात. स्त्रीभ्रुण हत्या, स्त्रीशिक्षण, बेटि बचाओ बेटि पढाओ, वृक्षसंवर्धन, पाणीजतन, रुग्णसेवा, निराधारांसाठी मदतकार्य  अशा सामाजिक प्रश्नांसाठी ते विविध उपक्रम राबवित असतात. लोकांमधे वाचनाचीही आवड निर्माण व्हावी असाही त्यांचा प्रयत्न करत असून त्यासाठी जटवाडा रोड येथील आपल्या माणुसकी सलुनमधे थेट वाचनालयाचीच सुरुवात केली आहे.
14 मार्च रोजी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांच्या हस्ते करण्यात आले
    सलुनमधे येणारे ग्राहक कटींग, दाढी, ़फेशियल आदींसाठी येतात. दुकानात गर्दी असेल तर लोक गप्पांमधे वेळ घालवतात किंवा आपल्या मोबाईमधे गुंततात. आज माणसाकडे असलेला प्रत्येक क्षण बहुमोल आहे. तेव्हा गप्पा किंवा मोबाईलवर मोलाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामासाठी या वेळेचा वापर व्हावा या हेतुने सुमित पंडीत यांनी सलुनमधेच वाचनालय सुरु करण्याची योजना आखली. यासाठी मुख्यमंत्र्यांचे सहायक सचिव विकास खारगे यांचे प्रोत्साहन त्यांना मिळाले आहे. परदेशात अशाच एका सलुनमधे वाचनालय सुरु केले असल्याचे सांगून माणूसकी सलुनमधे देखील अशाप्रकारचा उपक्रम सुरु करण्याचे खारगे यांनी पंडित यांना सुचविले आणी हे सलुन-वाचनालय प्रत्यक्षात अवतरले आहे. सलुनमधे एक विशेष जागा करुन तेथे ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील  हे बहुतेक एकमेव सलुन-वाचनालय असल्याचे पंडित सांगतात.
    ग्राहकाच्या ज्ञानात भर पडेल तसेच मनोरंजन होईल अशा प्रकारच्या पुस्तकांचा समावेश यात केला आहे. येथे सर्व वयोगटातील ग्राहक येत असल्याने पंडीत यांनी माणुसकी सलुन-वाचनालयामधे सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी पुस्तके ठेवली आहेत. यात लहान मुलांसाठी कथा, सामान्यज्ञान, कार्टुन्स, तरुणांसाठी अभ्यासात्मक पुस्तके, ज्येष्ठांसाठी कादंबर्‍या अशा पुस्तकांचा समावेश केला आहे. सलुनमधे आपल्या क्रमांकाची प्रतिक्षा करत असलेल्या ग्राहकांना वेळेचा सदुपयोग करुन पुस्तकवाचनातुन ज्ञानवृद्धी होत आहे. हाती मोबाईल घेऊन बसलेले लोक आता पुस्तकांच्या विश्वात चांगलेच रमत आहेत. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker