कोरोनाच्या विरोधात संपूर्ण देश घरात अन् औरंगाबाद....

Foto

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या महाभयानक विषाणू बरोबर सामना करण्यासाठी ‘जनता कर्फ्यू’ च्या माध्यमातून देशवासियांना केलेल्या एकजूटीचे आवाहनाला संपूर्ण देशातील नागरिकांबरोबरच औरंगाबादकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. शहरात अक्षरश: ‘संचार बंद’ होता. ऐतिहासिक आणि प्राचीन प्रार्श्‍वभूमी असेलेल्या या शहरात रविवारी इतिहास घडला. नेहमी  गजबजणारे  बाजारपेठा,  मध्यवर्ती बसस्थानक, सिडको   स्थानक, रेल्वे स्टेशन या भागात अभूतपूर्व शुकशुकाट होता.  कधी नव्हे  लोकांनी स्वयंस्फूर्तीने  ऐतिहासिक बंद पाड़ला. शहर  लॉकडाऊन होते.
जनता कर्फ्यू  सकाळी सुरुवात झाली असली तरी शनिवारी संध्याकाळपासूनच शहरात  अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. कोरोनाच्या विषाणुशी संपर्क येऊ नये म्हणून शहरात शिक्षणासाठी तसेच रोजी-रोटीसाठी आलेली मंडळी शनिवारीच आपआपल्या गावी परतली होती. रेल्वे स्थानक व बस स्थानकावर  तुरळक गर्दी वगळता अन्यत्र सामसूमच होती.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. औरंगाबादकरांनी कोरोनाविरोधात घरात बसण्याचा निर्धार केला असावा असे वातावरण होते.  आज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असणार असल्याचे शहरभर चित्र दिसत होते. या काळात व शहरातील जालना  रोड, रविवार  बाजार, मोंढा, पैठणगेट, क्रांतिचौक, मछलीखडक, सिटीचौक तसेच नेहमी  गजबजणारी  शाहगंज  भाजी  मंडी, फ्रुट  मार्केट, रोशनगेट, चेलीपुरा, लोटकारंजा कापड  मार्केट, औरंगपुरा, गुलमंडी, टीव्ही सेंटर आदी भागात पहिल्यांदाच अशा प्रकारची शांतता औरंगाबादकर अनुभवत होते.
रस्त्यांवर  घुमला पंतप्रधानांचा आवाज  
शहरातील एकूण एक रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अगदी नेहमी वर्दळीच्या असणार्‍या जालना रोड, मोंढा, गुलमंडी, औरंगपुरा, बसस्थानक आदी  निर्मनुष्य रस्त्यांवर टाचणी पडल्याचा देखील आवाज येईल अशी शांतता पाहायला मिळाली. अशाच वातावरणात बस स्थानक परिसरात रिक्षांना लागलेल्या भोंग्याद्वारे  जनता कर्फ्यु याने....... जनता के लिये.... जनता द्वारा लगाया गया कर्फ्यु...  असा पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा आवाज  कानी पडत होता. जणू भर सभेत त्यांचे भाषण सुरू असल्याची प्रचिती यावेळी पाहायला मिळाली.
मोंढा मंगळवारपर्यंत बंद  
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल आजपासून मंगळवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे बाजार समितीच्या वतीने एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी मार्केट कमिटीने हा निर्णय घेतल्याचे फळे व भाजीपाला आडत व्यापारी असोसिएशनच्यावतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर अध्यक्ष इसा खान हबीब खान, उपाध्यक्ष अर्जून येवले, सचिव जावेद खान तसेच राजू पाडसदान, नजिब खान आदी व्यापार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

 ऐतिहासिक  औरंगाबाद शहरातील जुन्या शहरात जनता कर्फ्युत लोकांनी  जोरदार  प्रतिसाद  दिला हे  कौतुकास्पद  मानावे  लागेल. गेल्या तीस चाळीस  वर्षात दंगलीच्या अनेक झळ बसलेल्या रोशनगेट, चेलीपुरा, लोटकारंजा,बुढीलेन  भागात कमालीची भयाण शांतता  होती.   बंद  मध्ये  सहभागी होण्यासाठी रोजपेक्षा तास दोन तास अगोदर काम आटोपण्याची लगबग होती. रविवारी पहाटे रमजान  महिन्याच्या  धर्तीवर   वृत्तपत्र, दूध, ब्रेड-पाव विक्रेते, डेली निड्स दुकानदारांचा यात समावेश होता.  सकाळी  फक्त   कचरा वेचकांसह मनपाचे  स्वच्छता व आरोग्य कर्मचारी मात्र रोजच्या कामावर दिसून आले.दूध वितरणासाठी रोज सकाळी सहाला  ग्रामीण  भागातून   शहरात येणारे दूधवाले   आज सकाळी दोन तास अगोदर घरातून बाहेर पडले. शहराततील दूध वितरण लवकर संपवून सातच्या आत घरी जाण्यासाठी निघाले होते.तसेच दूध बॅग रोज पाच पर्यंत मिळतात त्या आज दोन तास अगोदर मिळाल्याने कामही दोन तास अगोदर संपल्याचे दूध बॅग विक्रेते आपल्या  घरी  रवाना झाले. वृत्तपत्र विक्रेत्यांनीही अजब नगर, आकाशवाणी चौक खडकेश्वर भागात सकाळी चार पासूनच कामाला सुरुवात केली होती. सात पर्यंत वितरण संपवून तेही जनता कर्फ्युचे पालन कारणासाठी घरी परतले.    

धर्मगुरुंचे समाजाला आवाहन
 जामिआ इस्लामिया काशिफुल उलुम, जामा मस्जिद येथील धर्मगुरुंनी मुस्लिम समाजाला आवाहन केले होते.  सरकारने कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी जनता कर्फ्युचे पालन करण्यासाठी सांगितले आहे तरी घराबाहेर पडू नका. आपल्या आरोग्यासाठी जनता कर्फ्यु पाळायचे आहे. आज रात्री शब-ए-मेराज असल्याने मस्जिदमध्ये नमाज अदा केली जाईल. अल्लाहशी कोरोना आजार दूर करण्यासाठी दूवा करावे. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनास जनता कर्फु पाळताना सहकार्य करायचे आहे. रस्त्यावर बाहेर युवकांनी पडू नये. निरोगी व कोरोनामुक्त शहर आणि जिल्हा करण्यासाठी सरकारकडून ज्या उपाययोजना केल्या जात आहे त्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. कायद्याचे पालन करा गर्दी करु नका असे आवाहन खिदमाते हुज्जाज कमेटीचे अध्यक्ष मौलाना मुफ्ती नसीम मिफ्ताई यांनी केले. तसेच स्थानिक जमाते इस्लामी हिंद च्या वतीने ही आवाहन  करण्यात आले होते. जमातीचे  कार्यकारिणी  सदस्य सलीम सिद्दीकी यांनी  कोणत्याही  आपत्कालीन  परिस्थितीत गरजूंना औषधी, अन्नधान्याचा  पुरवठा  युथविंगच्या वतीने  पुरविण्यात  येईल अशी  माहिती  दिली. या संदर्भात  जिल्हाधिकार्‍यांना  एक  पत्र ही देण्यात आले. मुस्लिम  धर्मगुरूंच्या या आवाहनाला  मुस्लिमांनी जोरदार प्रतिसाद  दिल्याचे  दिसून आले.
आठवडी बाजारही बंद
शहरात जाफर गेट परिसरात भरणारा आठवडी बाजार देखील भरला नव्हता. यामुळे एरवी गजबजलेल्या असलेल्या या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. बाजार भरणार्‍या मैदानात जनावरे बांधलेली पाहायला मिळाली.
जनता कर्फ्यु याने
बस स्थानक निर्मनुष्य.........
एरव्ही हजारो प्रवाशांनी गजबजलेले असणारे मध्यवर्ती बस स्थानक आज निर्मनुष्य असल्याचे पाहायला मिळाले. गेट मध्ये एन्ट्री करताच सुरक्षा रक्षक संबंधितांना हटकत होते. आत केवळ मोजके कर्मचारी, तपासणी करणारे डॉक्टर्स,एवढेच लोक उपस्थित होते.  यासह बसस्थानकाची साफसफाई सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही प्रवासी बस स्थानकात  आले पण तेथे पोहोचल्यानंतर  तेथील कर्मचार्‍यांशी संवाद साधल्यानंतर बसेस रद्द झाल्याचे त्यांना कळाले. यानंतर शेवटी त्यांना निराश होऊन माघारी परतावे लागले.
हम नही सुधरेंगे......
संपूर्ण शहर लॉक डाऊन असताना, काही हौशे नागरिक दुचाकीवर शहरात रपेट मारत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी पोलीस कर्मचारी अशांना समजावत होते. शहागंज परिसरात अशाच एका हौशाला  थांबवून कहा जा रहे हो...... आज के दीन तो घरमे बैठो... भाई अशी विनंती करताना दिसून आले. या आजाराने राज्यात देखील बळी जात असताना शहरातील काही  लोक किती बेफिकीर आहेत हे दिसून आले. या सर्व प्रकारावरून हम नही सुधरेंगे अशीच काहीशी परिस्थिती निदर्शनाला आली.


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker