घाटीत रक्‍ताचा तुटवडा कारण .....

Foto
कोरोनाच्या भीतीने रक्‍तदाते पुढे येईना
औरंगाबाद  कोरोना व्हायरसच्या भीतीने रक्त दान शिबिर आयोजन होत नसल्याने आणि आयोजित शिबिरे  रद्द झाल्याने घाटीतील रक्त पेढीत रक्ताचा तुडवडा निर्माण झाला असून फक्त अति महत्वाच्या रुग्णांना दोन दिवस पुरेल एवढाच रक्त उपलब्ध आहे.येत्या काळात ही समस्या अजून गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.यामुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम जाणवत आहेत.अनेक अर्थव्यवस्था कोलमडल्या आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासनाच्या वतीने जन जागृती करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरे आयोजित करणे पूर्णपणे बंद झाले आहे.आठवडाभरापासून एकही शिबीर आयोजित झालेले नाही.शिवाय जे शिबिरे पूर्वनियोजित होती.ती देखील आयोजकांनी कोरोनाच्या भीतीने रद्द केली आहे.त्यामुळे शासकीय (घाटी) रुग्णालयात रक्ताचा भयंकर तुडवडा निर्माण झाला आहे.रक्तपेढि मध्ये सध्या तुरळक रक्त उपलब्ध असून अति गंभीर व अत्यावश्यक असणार्‍या रुग्णांनाच ते रक्त दिले जात आहे.हा पुरवठा फक्त दोन दिवस पुरेल एवढाच आहे.रक्तदात्यांनी रक्त दिले नाही तर येत्या काळात ही समस्या अजून गंभीर होणार आहे.

घाटीत रक्‍ताचा तुटवडा दोन दिवस पुरेल एवढाच साठा

रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन
नागरिक,समाजसेवक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे येऊन छोट्याखाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावी.ज्यांना शक्य होईल त्यांनी घाटी रुग्णालयाच्या रक्त पेढीत येऊन रक्त दान करावे सध्या रक्ताचा तुरळक साठा उपलब्ध आहे.तो फक्त दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच आहे.
- हनुमान रुळे,
जनसंपर्क अधिकारी, रक्तपेढी विभाग


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker