दारुची अधिकृत दुकाने बंद आणि अनधिकृत अड्डे सुरू

Foto

कोरोना आजाराचा गर्दीतून संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, बार व परमिटरुम, देशी-विदेशी दारुची दुकाने 31 मार्चपर्यंत बंदचा आदेश दिला. शुक्रवारी सायंकाळपासून सर्व अधिकृत परवानाधारक दुकाने व बार आणि परमीट रुम बंद झाले. पण 11 दिवस दुकाने बंद राहणार असल्याने अनधिकृत अड्ड्यावर मात्र जादा दराने दारूची सर्रास विक्री सुरू होती.  
जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. भारतात ही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत चार जन मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात ही काही रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील दुकाने, मॉल, थिएटरही यापूर्वीच बंद केली आहेत. शुक्रवारपासून जिल्ह्यातील मद्य विक्रीची देशी, विदेशी दारूची दुकाने, बार व परमिट रुम 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या जिल्ह्यात दररोज जवळपास दीड कोटी रुपयांची दारू विक्री केली जाते. 31 मार्चपर्यंत दुकाने बंद राहणार असल्याने मद्य शौकिनांना दारूचा स्टॉक करून ठेवला आहे. पण दररोज मजुरी करून किंवा व्यवसाय करून पैसे कमवितात अशा कामगारांकडे जादा पैसे नसल्याने स्टॉक करत आले नाही. पण दररोज दारू प्यायला लागते. शहरात आणि जिल्ह्यात हजारो दारू विक्रीची अनधिकृत अड्डे सुरू आहेत. हे अड्डे नियमितपणे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने सुरू असतात. ज्या दिवशी शासकीय सुट्टी (ड्राय डे) असतो. त्या दिवशी या अनधिकृत अड्ड्यावर जादा दराने दारूची विक्री होत असते.  विशेषतः स्लम भागात देशी दारूचे अड्डे सुरू असतात. कालपासून दारू बंद झाल्याने अनेक मद्यप्रेमीची मोठी अडचण झाली. मद्याचे व्यसन असल्याने या मद्यपींनी अनधिकृत अड्ड्याकडे मोर्चा वळविला. पण तेथे 52 रुपयांना मिळणारी देशी दारू 100 रुपयांना तर दिडशे रुपयांना मिळणारी नंबर-1 ची क्वॉटर 250 रुपयाला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिकृत दुकाने बंद केली असली तर अनधिकृत अड्डे मात्र जोरात सुरू आहेत. यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker