शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेला ‘कोरोना फटका.. वाचा सविस्तर

Foto
औरंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत असताना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेच्या अंमलबजावणीत कोरोनामुळे अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे बँकांच्या पातळीवर ही प्रकिया सध्या मंदावली आहे.
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजना जाहीर केली. जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 2 लाख 46 हजार 11 शेतकर्‍यांची यादी शासनाला पाठवली होती. त्यात जिल्ह्यातील 1 लाख 78 हजार शेतकरी पात्र ठरले. आतापर्यंत 1 लाख 78 हजार 653 पैकी 1 लाख 48 हजार 143 शेतकर्‍यांचे कर्जखाते आधार प्रमाणीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. अद्यापही 30 हजार 510 शेतकर्‍यांच्या कर्जखात्याशी आधार प्रमाणीकरण करण्याचे काम बाकी आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्यांपैकी बहुतांश शेतकरी कर्जमुक्‍त झाले असून, उर्वरित शेतकर्‍यांच्या खात्यावर लवकरच रक्‍कम जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यासाठीच्या उपाययोजना पाहता कर्जमुक्‍तीची पुढील प्रकिया लांबण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार 785 शेतकरी कर्जमुक्‍त झाले असून, सरकारने या शेतकर्‍यांच्या खात्यावर 593 कोटी 69 लाख 71 हजार 794 रुपये जमा केले आहेत. अद्याप 46 हजार 895 शेतकर्‍यांना कर्जमुक्‍तीची कारवाई सुरू आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक 81 हजार 410 शेतकर्‍यांच्या खात्यावर 185 कोटी 62 लाख 30 हजार 39 रुपये जमा झाले आहेत. अलाहाबाद बँकेच्या 747 कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्यावर 6 कोटी 93 लाख 53 हजार 85 रुपये, अ‍ॅक्सिस बँकेच्या चार शेतकर्‍यांच्या खात्यावर 2 लाख 69 हजार 271, बडोदा बँकेच्या 3 हजार 36 शेतकर्‍यांच्या खात्यावर 23 कोटी 54 लाख 45 हजार 664, बँक ऑफ इंडियाच्या 2402 शेतकर्‍यांच्या खात्यावर 19 कोटी 9 लाख 42 हजार 920,भारतीय स्टेट बँकेच्या 17 हजार 522 शतकर्‍यांच्या खात्यावर 135 कोटी 44 लाख 18 हजार 309 रुपये, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 11 हजार 859 शेतकर्‍यांच्या खात्यावर 99 कोटी 45 लाख 65 हजार 645, कॅनरा बँकेने 246 शेतकर्‍यांच्या खात्यावर 1 कोटी 54 लाख 49 हजार 261, सेंट्रल बँकेच्या 2442 शेतकर्‍यांच्या खात्यावर 18 कोटी 78 लाख 86 हजार 572, कॉर्पोरेशन बँकेच्या 30 शेतकर्‍यांच्या खात्यावर 49 लाख 1 हजार 421, एचडीएफसी बँकेच्या 31 शेतकर्‍यांच्या नावावर 34 लाख 16 हजार 865 रुपये, आयसीआयसीआय बँकेच्या 217 शेतकर्‍यांच्या खात्यावर 2 कोटी 99 लाख 17 हजार 719, आयडीबीआय बँकेच्या 777 शेतकर्‍यांच्या खात्यावर 7 कोटी 63 लाख 27 हजार 511 रुपये, कर्नाटक बँकेच्या दोन शेतकर्‍याच्या खात्यावर 3 लाख 27 हजार 209, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 10 हजार 270 शेतकर्‍यांच्या खात्यावर 85 कोटी 13 लाख 96 हजार 69, ओबीसी बँकेच्या 21 शेतकर्‍यांच्या खात्यावर 16 लाख 11 हजार 335, पंजाब नॅशनल बँकेच्या 341 शेतकर्‍यांच्या खात्यावर 2 कोटी 67 लाख 21 हजार 655, युनियन बँक ऑफ इंडियाच्या 400 शेतकर्‍यांच्या खात्यावर 3 कोटी 48 लाख 338 रुपये जमा करण्यात आले आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker