विदेशात राहणाऱ्या व्यक्ती बद्दल नातेवाईक शेवटी व्यक्त झालेच...

Foto
औरंगाबाद : संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या महाभयानक विषाणुशी झुंज देत आहे. जगातील 162 देशात कोरोनाने धूमाकुळ घातला आहे. आतापर्यंत सात हजारावर बळी या आजाराने घेतले आहे. कोरोनाच्या संदर्भात परदेशातून नित्य नवी माहिती येत आहे आणि ती माहिती ज्यांचे आप्तेष्ठ परदेशात आहेत त्यांच्यासाठी कळ उमटवणारी आहे.
आपल्याच देशात अन्य शहरात आपला काळाजाचा तुकडा असेल तरीही जिवाला एक प्रकारचा घोर लागतो. काही शहरवासीयांची मुलं तर थेट परदेशात आणि त्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव जेथे मोठ्या प्रमाणात आढळून येतो अशा देशात आहे. त्यामुळे त्यांची चिंता किती तरी पटीने मोठी असली तर नवल नाही. अशा पार्श्‍वभूमिवर सांजवार्ताने प्रात्यनिधीक स्वरूपात दोन पालकांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मुलीने लावला जीवाला घोर
माझी मुलगी छाया युसमध्ये असते. तिकडे व्हर्जिनिया राज्यात ग्लेनअन शहरात ती राहते. त्यांच्याकडे देखील  कोरोना  रुग्णांची संख्या जास्तच आहे. त्यामुळे एप्रिलपर्यंत नातवांच्या शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. मात्र अजून वर्क फ्रॉम होम हे सगळ्याच कंपन्यानी केलेले नाही. तिकडे एका दिवसातच 3400 मृत्यू वाढले. त्यामुळे आम्ही इकडे भारतात आणि मुलगी तिकडे असल्याने खूप काळजी वाटते. लॉकडाऊन असल्यामुळे जे जिथे आहेत तिथेच अडकून पडलेले आहेत. छायाला इकडे बोलावणे शक्य नाही.
- वसंत पाटील

अमेरिकेत आहे पण तरी काळजी आहेच
माझी कन्या सूष्मा युएस येथे एक्सस मधील डेलक्स याठिकाणी असते. तिकडे देखील कोरोनाचा प्रादूर्भाव वाढलेला दिसत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय बंद आहेत. ती सध्या शिकत आहे परंतु कोरोना मुळे तिकडे घरुनच परिक्षा घेण्यात आल्या . तिने घरुनच परिक्षा दिली. तिचे पती देखील घरातून काम करत आहेत. एक दोन दिवसातून फोन होत असतो. फोनवरच ख्यालीखुशाली कळते. तरीही बाहेर परक्या देशात अशा परिस्थितीत काळजी मात्र वाटतेच. तिकडे खूप स्वच्छता आहे. तसेच लोकांच्या सुरक्षेसाठी काही नंबर्स त्यांना दिलेले आहेत.
- सुभाष पाटील

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker