राज्यातील निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलल्या : टोपे

Foto
मुंबई : करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यास सांगण्यात आलं आहे. राज्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

     या निर्णयासोबतच राज्यातील ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत . याबाबत निवडणूक आयोगाला सूचना देण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच, मंत्रालयामध्ये सर्वसामान्य नागरिकाला  आता प्रवेश मिळणार नाही. राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला असून त्यांना जास्त लोकांना बोलावू नका. ईमेलचा वापर करा असं सांगण्यात आलं आहे. जिथे अनावश्यक फक्त मनोरंजनासाठी गर्दी केली जाते. त्याठिकाणी जमावबंदी लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker