व्हॅलेंटाईन डे विशेष ! भेटवस्तू द्याची आहे ना ? तर वाचा हे.

Foto
ग्रीटिंग, आकर्षक भेटवस्तूनी गिफ्टशॉप सजल्या
औरंगाबाद :- आपल्या जोडीदाराविषयी मनात भावना कितीही असल्या तरी प्रेमाचा तो एक दिवस काहीतरी खास असतो. व्हॅलेंटाइन दिवसाचे निमित्त म्हणून आपल्या जोडीदाराला विविध प्रकारचे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त केले जाते. त्यानिमित्ताने बाजारात विविध आकर्षक भेटवस्तू सज्ज झाल्या आहेत. त्यात गिफ्टशॉपही सजल्या आहेत. ग्रीटिंग घेण्याकडे सर्वांच कल वाढला आहे. त्यात म्युझिकल ग्रीटिंग, पर्सनाइज भेटवस्तूची सर्वाधिक क्रेझ वाढली आहे.

प्रेमाचे प्रतीक असलेली काही भेटवस्तू देण्याकडे युवक-युवतीं प्राधान्य देतात. तरुणांसह ज्येष्ठ लोकसुद्धा व्हॅलेंटाइन दिवस जवळ येऊ लागला की बाजारात गर्दी करतात. पूर्वी केवळ भावना शब्दात व्यक्त केले जात होते. तसेच काहीजण हाताने प्रेमपत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करत होते. जस-जसा काळ बदलला तशी आधुनिक जीवनशैली आत्मसात करणाऱ्या पिढीची जगण्याची पद्धती बदलल्या. आवडी-निवडी बदलल्या. प्रेमासारख्या नाजूक भावनेलासुद्धा या आधुनिक जीवनशैलीने स्पर्श केला आणि प्रेम व्यक्त करण्याचे पद्धत वेगवेगळ्या दिसून आले. पत्र लिहिण्याचा काळ मागे पडला पत्रांची जागा रंगीबेरंगी भेटकार्डानी घेतली. प्रेमाचा संदेश देणारे हे भेटकार्ड आजही तरुणांच्या पसंतीस उतरत आहे. आकर्षक भेटवस्तूनी बाजार सज्ज झाला आहे.

फोटो प्रिंट केलेल्या गिफ्टचे सर्वाधिक आकर्षण
अलीकडे सेल्फी काढण्याचा ट्रेड वाढला आहे. त्यामुळे गिफ्ट देतानाही आपल्या जोडीदाराचाच फोटो प्रिंट करून फ्रेम करून देण्याची सर्वाधिक क्रेज आहे. तसेच कपवर फोटो, त्यात मॅजिक कप, तसेच हार्ट आकाराच्या उशिवर फोटो, टेडीवर फोटो, टी शर्टवर आपल्या जोडीदाराचा फोटो प्रिंट करून व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा दिल्या जाणार आहे. यासाठी तरुण मंडळी या भेटवस्तू घेण्यासाठी सर्वाधिक गर्दी करत आहेत. याशिवाय आपल्या जोडीदाराचे नाव प्रिंट केलेले किचन, गळ्यातील चैन , हातातील ब्रासलेट वरही आपल्या जोडीदाराचे नाव प्रिंट करण्याला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे सुहास देशपांडे यांनी सांगितले.

विविध प्रकारच्या चॉकलेट घेण्याकडे कल
व्हॅलेंटाईन डे निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात चॉकलेटची खरेदी केली जाते. ही मागणी यावर्षीही कायम आहे. त्यानिमित्ताने यावर्षी व्हॅलेंटाईन डे निमित्ताने गिफ्ट विक्रेत्यांनी विविध प्रकारचे आकर्षक दिसणारे चॉकलेट विक्रीसाठी आणले आहेत. त्यात हार्ट शेफ आकारात चॉकलेट ची सर्वाधिक मागणी केली जात आहे. तसेच संपूर्ण विकची किट मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. त्यात चॉकलेट, टेडी, आर्टिफिशियल फ्लॉवर आदीचा समावेश असलेली किटला सर्वाधिक मागणी केली जात असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker