ब्रेकिंग न्यूज : महाराष्ट्रात कोरोना मुळे दुसरा बळी

Foto

महाराष्ट्रात कोरोनामुळे दुसरा बळी गेला आहे व देशात एकूण पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 74 झाली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  महाराष्ट्रात शनिवारपर्यंत ही संख्या 64 वर होती. आज 10 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. यामध्ये 6 मुंबई आणि 4 पुण्याचे रुग्ण आहेत.संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.  आज कोरोना बाधीतांमधील एका रुग्णाचा मृत्यू एचएन रिलायन्स रुग्णालय मुंबईमध्ये झाला. मृत रुग्ण हा 56 वर्षांचा होता. ही व्यक्ती 21 मार्चला रुग्णालयात दाखल झाली होती. आता महाराष्ट्रात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात 5 जणांचे बळी गेले आहेत. 
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
पुण्यातील दाम्पत्य (2) - 9 मार्च
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) - 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)- 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)- 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) - 11 मार्च
नागपूर (1) - 12 मार्च
पुणे (1) - 12 मार्च
पुणे (3) - 12 मार्च
ठाणे (1) - 12 मार्च
मुंबई (1) - 12 मार्च
नागपूर (2) - 13 मार्च
पुणे (1) - 13 मार्च
अहमदनगर (1) - 13 मार्च
मुंबईत (1) - 13 मार्च
नागपूर (1) - 14 मार्च
यवतमाळ (2) - 14 मार्च
मुंबई (1) - 14 मार्च
वाशी (1) - 14 मार्च
पनवेल (1) - 14 मार्च
कल्याण (1) - 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) - 14 मार्च
औरंगाबाद (1) - 15 मार्च
पुणे (1) - 15 मार्च
मुंबई (3) - 16 मार्च
नवी मुंबई (1) - 16 मार्च
यवतमाळ (1) - 16 मार्च
नवी मुंबई (1) - 16 मार्च
मुंबई (1) - 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) - 17 मार्च
पुणे (1) - 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) - 18 मार्च
मुंबई (1) - 18 मार्च
रत्नागिरी (1) - 18 मार्च
मुंबई महिला (1) - 19 मार्च
उल्हासनगर महिला (1) - 19 मार्च
अहमदनगर (1) - 19 मार्च
मुंबई (2) - 20 मार्च
पुणे (1) - 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) - 21 मार्च
मुंबई (8) - 21 मार्च
यवतमाळ (1) - 21 मार्च
कल्याण (1) - 21 मार्च
एकूण - 74 कोरोनाबाधित रुग्ण आहे. 
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू झालेआहे  ?
कर्नाटक - 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 11 मार्च
दिल्ली - 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) - 13 मार्च
मुंबई - 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 17 मार्च
पंजाब - एका रुग्णाचा मृत्यू (1) - 19 मार्च
मुंबई  - 56 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) - 22 मार्च
एकूण - 5 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker