‘पाच बॉयफ्रेंड असणे ही मुलीची मर्जी : नेहा धुपिया

Foto
रिलेशनशिपमध्ये फसवणूक झाल्याने गर्लफ्रेंडला कानाखाली मारल्याचे सांगणार्‍या स्पर्धकाला अभिनेत्री नेहा धुपियाने सुनावले. या घटनेनंतर ‘रोडीज रिव्हॉल्यूशन’ हा रिअ‍ॅलिटी शो आणि नेहा चांगलेच चर्चेत आले. पाच बॉयफ्रेंड असणे ही मुलीची मर्जी असे म्हणणार्‍या नेहा धुपियावर नेटकर्‍यांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर आता नेहाने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित ट्रोलिंगवर मौन सोडले आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून रोडीज या शोचा भाग आहे. देशातल्या सर्व भागातील स्पर्धकांची एक टीम बनवण्याची संधी या शोने मला दिली. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून जे काही सुरू आहे, ते मला मान्य नाही. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये मी हिंसेच्या विरोधात आवाज उठवला होता. गर्लफ्रेंड आपल्याला धोका दिल्याचे एका मुलाने सांगितले. फसवणुकीविरोधात त्या मुलाने गर्लफ्रेंडवर हात उगारला. ही गोष्ट मला चुकीची वाटली. फसवणूक करणार्‍यांची मी साथ देत नाही, मात्र हिंसेला माझा विरोध आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला हे फार दुर्दैवी आहे. प्रत्येकाची आपली आवड-नावड असते. आपल्या आवड-नावडीनुसार जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मात्र एखाद्याला मारहाण करण साफ चुकीचं आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून माझे कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार यांना वाईट पद्धतीचे मेसेज येत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत. माझ्या वडिलांना व्हॉट्सअ‍ॅपवर शिव्यांचे मेसेज येत आहेत. माझ्या मुलीच्या सोशल मीडिया पेजवर अश्लील व अर्वाच्च भाषेत मेसेज लिहिले जात आहेत. मी हे अजिबात सहन करणार नाही. महिलांसोबत होणार्‍या हिंसेच्या मी कायम विरोधात आहे आणि असेन. एका महिलेच्या तुलनेत पुरुषाचे बळ अधिक असते. घरगुती हिंसाचार ही फक्त भारतातील नाही तर जगभरातील मोठी समस्या आहे. जर तुम्ही हे सहन करत असाल तर आवाज उठवा. तुम्ही एकटे नाहीत. नेहा सध्या छोट्या पडद्यावरील ‘एमटीव्ही रोडीज’ या शोमध्ये परीक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. या शोमध्ये काही दिवसापूर्वी एका स्पर्धकाने हजेरी लावली होती. यावेळी माझ्या एक्स गर्लफ्रेंडचे पाच प्रियकर होते. त्यामुळे मी तिच्या कानशिलात लगावली, असे या स्पर्धकाने सांगितले. या स्पर्धकाने सांगितलेल्या किस्स्यानंतर नेहाने त्याला चांगलेच झापले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker