शिवजयंती मिरवणुकीत भोसकून तरुणाची हत्या; एक आरोपी अटकेत एक फरार..

Foto
पुंडलीकनगर भागातील दुकाने केली बंद. मृतदेह ताब्यात घेण्यास नकार..
औरंगाबाद : शिवजयंती मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या कारणावरून  बुधवारी रात्री दोघांनी 21 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यार भोसकून हत्या केली होती.या घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली मात्र जो पर्यंन्त दुसरा आरोपी अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला.तर पुंडलिकनगर भागातील बाजारपेठतिल दुकाने तरुणांनी बंद केली होती.


 बुधवारी रात्री नऊ। वाजेच्या सुमारास श्रीकांत गोपीचंद शिंदे या 21 वर्षीय तरुणाची झेंडा दिला नाही या रागातून राहुल सिद्धेश्व भोसले व विजय शिवाजी वैध या दोघांनी धारदार तीक्ष्ण हत्याराने पोटात भोसकून हत्या केली होती.हत्येनंतर  पसार झालेला आरोपी विजय वैध ला पुडलीकनगर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली.मात्र या घटनेतील प्रमुख आरोपी राहुल भोसले हा अद्याप फरार आहे. आरोपी पकडण्यात आल्याची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईक मित्रपरिवारणी पुंडलीकनगर पोलिस ठण्यासमोर गर्दी केली होती.सुमारे दीडशे ते दोनशे नागरिकांनी गर्दी केली होती.त्यामुळे काही काळ ठण्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुख्य आरोपी भोसले जो पर्यंत अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या आरोपिला देखील लवकरच अटक करू असे आश्वासन दिल्या नंतर हा जमाव पोलीस ठाण्यातून निघून गेला. मात्र दुपार पर्यंत मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला न्हवता.

संतप्त जमावाने केली दुकाने बंद...

आज सकाळी पोलीस ठाण्यात जमाव जमल्या नंतर या जमावतील सुमारे 50 ते 60 जणांनी पुंडलीकनगर चौक गाठत चौकातील दुकाने बंद केली.या वेळी एका बँकेतील नागरिकांना बाहेर काढून बँक बंद करण्यात आली. दुपार पर्यंत दुकाने बंद करण्यात येत होत्या या मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.कुठलीही अनुचित घटना घडू नये या साठी परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker