गंगापूर शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षक सेनेचा ऐतिहासिक विजय!

Foto
गंगापूर :- गंगापुर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत शिक्षक सेनेने बाजी मारली असून परिवर्तन पॅनलचे १७ पैकी १२ तसेच  मधुकर वालतुरे  यांच्या  नेतृत्वाखालील शिक्षक संघाचे ५  उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे शिक्षक सेनेने पतसंस्थेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले असून एकहाती सत्ता आली आहे.
            मागील २५ वर्षांपासून पतसंस्था शिक्षक संघाच्या ताब्यात होती. परंतु पतसंस्थेत न होणारे बदल, इतर पतसंस्थांच्या तुलनेत जास्त व्याजदर व अपारदर्शक कारभार तसेच सभासदांवर दबावतंत्र या कारणांमुळे सभासदांनी यावेळी शिक्षक संघाच्या पॅनल ला पाठ दाखवून मोठा धक्का देत शिक्षक सेनेचा पर्याय स्वीकारला आहे.
            कन्नड शिक्षक पतसंस्थेच्या धर्तीवर गंगापुर तालुक्यातील पतसंस्थेचा विकास करण्याचे व्हिजन तालुक्याला दाखविल्यामुळे तसेच मागील पाच वर्षांत शिक्षक हितासाठी संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाल्याने शिक्षक सेनेला हा विजयश्री मिळाला असल्याचे भगवान हिवाळे यांनी सांगितले.
   शिक्षकसेनेचे सुनिल जाधव,भगवान हिवाळे, प्रभाकर पवार, अनिल काळे,जनार्दन राऊत,राजु गायकवाड,उद्धव बोचरे,जगन गिते,राजेंद्र साळवे,मच्छिंद्र बडोगे, गिता जाधव,ज्योती मारकवाड हे विजयी उमेदवार आहेत.शिक्षकसेनेच्या विजयी उमेदवारांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker