व्हॅलेन्टाइन डे चा तरुण तरुणींमध्ये उत्साह ...

Foto
व्हॅलेन्टाइन डे म्हणजेच प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठाही विविध भेटवस्तूंनी फुलल्या आहेत. विशेष म्हणजे औरंगाबादेत  गुलाबपुष्प बाजारात दाखल झाली आहेत.

चॉकलेटचे नवीन प्रकार, शुभेच्छा पत्रे, टेडीबीअर, विविध आकर्षक भेटवस्तू आदी दुकानांमध्ये पाहावयास मिळत आहेत. अगदी १० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत मराठी व इंग्रजी शुभेच्छा पत्रे, २० ते ५०० रुपयांपर्यंतची विविध प्रकारची चॉकलेट दुकानांमध्ये मिळत आहेत. लाल रंग हा प्रेमाचा रंग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे भेटवस्तूंची दुकाने लाल रंगात न्हाऊन निघाली आहेत. विविध वस्तूही लाल रंगाच्या आकर्षक वेष्टनात मिळत आहेत.गुलाबपुष्प म्हणजे प्रेमाचे प्रतीक. त्यामुळे  बाजारपेठा गुलाबांनी फुलल्या आहेत. कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबांच्या मळ्यातून ही फुले मागविल्याने गुलाब विक्रेत्यांनी सांगितले.
व्हॅलेन्टाइन्स डेनिमित्त दर वर्षीपेक्षा वेगळे आणि हटके असणाऱ्या वस्तू यंदा दुकानदारांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातही ‘सिक्रेट मेसेज बॉटल’ला तरुणाईची अधिक मागणी आहे. आजच्या व्हॉट्सअपच्या काळातही अनेक तरुणांना आपल्या मनातील भावना एकमेकांना समोरासमोर सांगता येत नाही. त्यामुळे खास या सिक्रेट मेसेज बॉटल हा पर्याय उपलब्ध करून दिला असून त्यामध्ये असलेल्या चिठ्ठीवर आपल्या मनातील भावना व्यक्त करता येणार आहेत. या बॉटल ७० ते ५०० रुपयांपर्यंत लहान-मोठय़ा आकारात उपलब्ध करून दिल्या असून त्या खरेदी करण्यासाठी तरुणाईची झुंबड उडाली आहे. ‘लव्ह टेस्टिंग स्टण्ड’ ही भेटवस्तूही तरुणाईची आकर्षण ठरली आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker