अवैध दारू विकणाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका ५ देशी व २ विदेशी दुकानांवर छापे; १३ गुन्हे दाखल

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
शहरातील अवैध दारू विक्री आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करीत मागील काही दिवसांत पाच देशी आणि दोन विदेशी दारू दुकानांवर छापे टाकून १३ गुन्हे दाखल करण्यात आले. या दुकानांमधून सातत्याने परवान्याच्या अटी व शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी या सातही दुकानांचे परवाने कायमचे रद्द करण्याचे शिफारस पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी ८ जून रोजी या धडक कारवाईची माहिती दिली.
आरोपींमध्ये अनेक दारू दुकान मालकांसह चालकांचीही नावे होती. दरम्यान, शहरात
पोलीस विभागाच्या पत्राबाबत आमच्याकडे माहिती नाही. मात्र त्यावरून संबंधित दारू दुकानदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर नेमक्या कोणत्या अटी व शर्तीचे उल्लंघन झाले आहे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित दारू दुकानांवर योग्य ती कारवाई करतील.
अभिनव बालुरे,
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
काही अशी दुकाने आहेत, तिथे वारंवार अवैध विक्रीबाबतच्या तक्रारी येतात. तसेच, मद्यपींना उघड्यावर दारू पिण्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. केवळ विक्रीचा परवाना असताना दारू पिण्यासाठी उघड्यावर सोय करून
देण्यात येत असल्याचेही समोर आले आहे. ग्राहकांना चकणा, पाणी, शीतपेय उपलब्ध करून दिल्याचेही काही प्रकरणांमध्ये समोर आले. पोलीस कारवाईनंतरही हे प्रकार कमी होता नसल्यामुळे आता त्यांचे परवाने निलंबित करावेत, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल आहे.
या दारू दुकानांवर होणार कारवाई
पीर बाजार, उस्मानपुरा येथील देशी दारू दुकान, शिवाजीनगर रेल्वे पटरीजवळील देशी दारू दुकान, झाल्टा फाटा, बीड बायपास येथील देशी दारू दुकान, आझाद चौकाजवळील देशी दारू दुकान, आंबेडकरनगर येथील देशी दारू दुकान. विदेशी दारू दुकाने : ग्लोरिअस वाईन शॉप, बेंबडे हॉस्पिटल शेजारी, बीड बायपास, जॉन वाईन शॉप, ओअॅसिस चौक, वाळूज महानगर.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions