छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात राबवल्या जाणाऱ्या राज्यातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या चाचणीमुळे महानगरपालिकेला वीज बिलाचा मोठा 'शॉक' बसला आहे. जलवाहिनीचे टेस्टिंग आणि शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी पंपिंग सुरू झाल्याने मनपाचे मासिक वीज बिल ५ कोटींवरून थेट साडेसहा कोटी रुपयांवर गेले आहे. विशेष म्हणजे, ही योजना जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हा हा वीज बिलाचा आकडा दरमहा ९ ते १० कोटी रुपयांच्या घरात जाण्याची
मनपाने घेतले ८२२ कोटींचे कर्ज
नव्या पाणीपुरवठा योजनेतून शहराला सुमारे ४०० एमएलडी पाणी पुवठा करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी पुरवठा होईल. साधारणतः वर्षभराने ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाईल, त्यानंतर पाणी योजनेचे वीजबिल ९ ते १० कोटींपर्यंत जाईल. या योजनेसाठी महापालिकेने ८२२ कोटी कर्ज घेतले असून, त्याचा हफ्ता, वीजबिल आणि इतर खर्च भागविणे मनपा प्रशासनासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. वीजबिलावर अंकुश ठेवण्यासाठी तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी सोलार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी जागेचा शोध सुरू असून, विद्यमान आयुक्त अमोल येडगे यांनी या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शक्यता वर्तवली जात असून, यामुळे मनपाच्या तिजोरीवर मोठा ताण पडणार आहे. जॅकवेल उभारणी,
३८ किमी लांबीची मुख्य जलवाहिनी, नक्षत्रवाडीत जलशुद्धीकरण केंद्राचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केल्यावर
पंपिंग सुरू करून जॅकवेलमधील पाणी शहराकडे सोडण्यात आले. जॅकवेलवर दोन पंप बसविण्यात आलेले आहेत. एक पंप सुरू करून जलवाहिनीची स्वच्छता तसेच टेस्टिंग करण्यात आली. टप्प्याटप्प्याने पंप चालू करून पाइपलाइन स्वच्छ करून घेण्यात आली.
नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यात आली. ८-१० एमएलडी पाणी शहरवासीयांना पुरवठा करण्यास सुरवात झाली आहे. पाणी उपशासाठी सुरू केलेल्या मोटारी व पंपांमुळे वीजबिल दीड कोटी रुपयांनी वाढले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions










