छत्रपती संभाजीनगर, आहेत. (सांजवार्ता ब्युरो) लग्नाच्या पंगतीसाठी बेकायदेशीरपणे गोवंश मांसाची ऑर्डर देणाऱ्या ६० वर्षीय व्यापाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानंतर पोलीस दलाने ही धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईमुळे गोवंश मांसाची बेकायदेशीर खरेदी करणारे आणि त्याचा पुरवठा करणारे, असे दोन्ही रॅकेट पोलिसांच्या रेकॉर्डवर आले
फय्याज खान अली खान (६०, रा. सब्जीमंडी, खोकडपुरा) असे अटकेतील व्यापाऱ्याचे नाव आहे. मोंढा नाका उड्डाणपूल परिसरात त्याची मोठी दुकान आहे, असे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले. दरम्यान, केवळ कत्तल करणाऱ्यांवरच नाही, तर आता गोमांसाची मागणी
करणाऱ्यांवरही गुन्हे शाखेने वक्रदृष्टी वळवली आहे. बुक्कलगुडा परिसरातील अबरार बीफ शॉपवर गुन्हे शाखेने ५ जून रोजी छापा टाकला. तिथे विखार अबरार कुरेशी याने गोमांस विक्रीसाठी ठेवल्याचे उघड झाले. पोलिसांनी जेव्हा या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता, खोकडपुरा येथील ६० वर्षीय व्यापारी फय्याज खान
अली खान याने मुलाच्या लग्नाच्या कार्यक्रमात वन्हाडींसाठी हे गोवंश मांस मागवल्याचे स्पष्ट झाले.
थेट लग्नात छापे टाकणार
गोवंश कत्तलीला बंदी असली तरीही हॉटेल, लग्न समारंभात गोवंश मांस मिळत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. आता कारवाई तीव्र करून हॉटेलात, लग्नात गोवंश मांस बनवणारे आणि ऑर्डर देणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल.
यापुढे लग्नातच छापे टाकले
आश्रयदातेही आले रडारवर
गोवंश तस्करांवरील मकोकाच्या गुन्ह्यात ६० ते ७० नावे समोर आली. अटकेतील आरोपींनीच ही नावे दिली आहेत. त्यात काही राजकीय पदाधिकारीही आहेत. त्यांचे आश्रयदातेही यापुढे अटक केले जातील. आरोपींवर दबाव टाकणाऱ्यांनाही आरोपी केले जाईल.
आरोपींनी लावली वकिलांची फौज
जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ मे रोजी गोवंश क्रूरपणे डांबून ठेवणाऱ्या संघटित टोळीवर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने मोक्का लावला आहे. या प्रकरणी नऊ तस्करांना अटक करण्यात आली. सोमवारी (दि. ८) आरोपींची कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या बाजूने २३ वकील न्यायालयात उभे होते.
जातील, असा इशारा पोलीस
आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions










