पैठणखेडा येथील 2 तरुण नदीत बुडाले

Foto
एकाचा मृतदेह काढण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश
बिडकीन जवळील पैठण खेडा येथे कोल्हेच्या नदीला बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आलेल्या पुरामध्ये पुंजाराम कैलास नवले(24) व अशोक परशुराम घुले (22) हे दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. आज सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांना एकाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून दुसर्‍याचा शोध सुरू आहे.
हे दोघे पूर आलेला असताना पाण्यातून गावात जाण्याच्या प्रयत्नात होते.  या दोघांपैकी पुंजाराम नवले वाहून जात असल्याचे दिसताच त्याला वाचविण्यासाठी अशोक घुले यांनी इकडाचा तिकडचा विचार न कक्षरीता थेट उडी घेतली. 
मात्र नदीचा प्रवाह जास्त असल्याने अशोक सुद्धा वाहून गेला. दोन्ही युवक पैठण खेडा गावातील असल्यामुळे ही बातमी समजताच गावकर्‍यांनी नदीच्या तिरावर मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती बिडकीन पोलिसांना मिळताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन गावकर्‍यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू ठेवले होते मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे आज सकाळपासून अग्निशमन दलाच्या मदतीने शोध कार्य सुरू असताना पुंजाराम नवले या युवकाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनाबाहेर काढण्यात यश आले. वृत्त हाती येईपर्यंत अशोक परशुराम घुले यांचा शोध सुरू होता.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker