सहायक फौजदाराची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

Foto
येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड (वय 55) हे आज मंगळवारी सकाळी 8.45 वा. दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्यादरम्यान, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेतल्या. त्यातच त्यांचा जीव गेला. 
घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल आहेत. वृत्तदेईपर्यंत आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker