दहावीतही मुलीच भारी

Foto
राज्याचा 95.30 %  तर औरंगाबाद विभागाचा सर्वात कमी 92 % निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दहावीच्या निकालाकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते. अखेर आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला  आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली. राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल 95.30 टक्के लागला. राज्यात औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 92 टक्के लागला आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावी परीक्षेचा निकाल दरवर्षी जून महिन्यात लागत असतो. मात्र यंदा कोरोनाचे सावट पसरल्याने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण 95.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण बोर्डाची टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.77 टक्के लागला. राज्यातील 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळविले आहेत. तसेच राज्यातील 8360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात 18.20 टक्के वाढ झाली आहे. दहावी परीक्षेला एकूण 15 लाख 84 हजार 264 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 75 हजार 103 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद सर्वात कमी निकाल 92 टक्के लागला आहे. 
औरंगाबाद विभागाचा 92 टक्के निकाल
औरंगाबाद विभागातून 1 लाख 85 हजार 935 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 84 हजार 764 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 1 लाख 69 हजार 991 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण विभागाचा निकाल 92 टक्के लागला. औरंगाबाद जिल्ह्यातून 64 हजार 873 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर त्यापैकी 64 हजार 628 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी 59 हजार 523 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा दहावीचा निकाल 92.10 टक्के लागला. तर जालना जिल्ह्यातुन 32 हजार 517 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 32 हजार 361 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर त्यापैकी 30 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर जालना जिल्ह्याचा निकाल 94.4 टक्के लागला. तसेच बीड जिल्ह्यातील 43 हजार 105 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 788 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी 39 हजार 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर बीड जिल्ह्याचा निकाल-91.24 टक्के लागला. तसेच परभणी जिल्ह्यातील एकूण 28 हजार 944 विद्यार्थ्यांपैकी 28 हजार 685 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 26 हजार 7 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परभणी जिल्ह्याचा निकाल 90.66 टक्के लागला. याशिवाय हिंगोली जिल्ह्यातून 16 हजार 496 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 हजार 302 विद्यार्थी परीक्षेला बसले. तर त्यात 14 हजार 988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण हिंगोली जिल्ह्याचा 91.94 निकाल एवढा लागला लागला.
यंदाही मुलींचीच बाजी
औरंगाबाद विभागात मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या ही 5.75 टक्क्यांनी जास्त आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड असे एकूण विभागात मुलांची उत्तीर्ण होण्याची संख्या 89.44 टक्के जास्त आहे. मुली सर्वाधिक 95.19 टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker