एनसीबी जोरात अन् सीबीआय कोमात

Foto
सुशांतसिंह राजपूत प्रकरण...
एनसीबी जोरात अन् सीबीआय कोमात
सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या की आत्महत्या यावरून उठलेल्या वादळामुळे केंद्र सरकारने बिहार सरकारच्या मागणीवरून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. पण आठ दिवसाच्या सीबीआय तपासानंतर सुशांतसिंह प्रकरणात ड्रग्जचा संबंध आल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो संस्थेचा प्रवेश झाला. ड्रग्जच्या प्रकरणात अनेक दिग्गज रथी महारथींची नावे पुढे येत नसल्याने सध्या एनसीबी जोरात कामाला लागली आहे. तर आत्महत्येचा शोध घेणारी सीबीआय मात्र कोमात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. 
सिने अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोेंद करून तपास सुरू केला होता. पण दीड महिना तपास करून मुंबई पोलिसांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सीबीआय मार्फत तपासाची मागणी केली. दीड महिन्यानंतर सुशांतच्या वडिलांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर सीबीआयची चौकशी सुरू झाली. या प्रकरणात आर्थिक कारण असल्याचे सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत म्हटल्याने ईडी मार्फत चौकशी सुरू झाली. ईडीने रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबियांची व अन्य कर्मचार्‍यांची चौकशी केली. त्यानंतर सुशांत ड्रग्ज घेत असे. त्याच्या फार्म हाऊसवर पार्ट्या होत असत. तेथे अनेक कलाकार ड्रग्जचे सेवन करीत असल्याचे तपासात आढळून आले. त्यामुळे सीबीआय, ईडीनंतर एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) संस्थेचा प्रवेश झाला. या संस्थेने रिया व तिचा भाऊ शौविक ड्रग्ज पुरवठा करीत असल्याने त्यांना अटक केली. तसेच ड्रग्ज चौकशीत अनेक सिने कलाकार ड्रग्जचे सेवन करीत असल्याचे व्हॉट्स अ‍ॅप चॅटवरून पुढे आले. त्यामुळे सिने सृष्टीतील सिनेतारकांची नावे पुढे आली. असून पुरुष कलाकारांची नावे पुढे आली नाहीत. पण या प्रकरणात  मोठे रॅकेट उघड होणार आहे. 
गेल्या पंधरा दिवसांपासून सुशांत आत्महत्या प्रकरणाची चक्रे फक्‍त एनसीबी भोवती फिरत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आत्महत्या प्रकरणाऐवजी कोणते कलाकार ड्रग्जचे सेवन करतात. त्यांचीच चौकशी सुरू आहे. ज्या ज्या कलाकारांची चौकशी होणार आहे त्याचा सुशांतच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. ड्रग्ज सेवन करणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे. सुशांतने आत्महत्या का केली त्याच्या आत्महत्येस कोण जबाबदार आहे हे शोधणे आवश्यवक आहे. ते काम सीबीआयला करावे लागणार आहे. पण सध्या सीबीआय ऐवजी एनसीबीची गाडी जोरात असल्याचे दिसून येत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker