खा. नवनीत राणा अत्यवस्थ; नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये हलवले

Foto
 पाच दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना अमरावतीहून थेट नागपूरमध्ये नेण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट 6 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी अमरावतीत घरीच उपचार घ्यायला सुरुवात केली होती. मात्र, पाच दिवसानंतरही त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. उलट त्यांना अधिकच त्रास होऊ लागल्याने अखेर त्यांना नागपूरमध्ये नेण्यात आले असून येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नवनीत राणा यांच्यासह त्यांचे पती आमदार रवी राणा आणि दोन्ही मुले, सासू-सासर्‍यांसह कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपाचर सुरू आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker