जुगार अड्ड्यावर छापा... ८ जुगारी पकडले

Foto
सेव्हन हिल भागातील रवि किरण हॉटेलात झन्ना-मन्ना जुगार खेळणा-या अकरा  जुगारींना पुंडलिकनगर पोलिसांनी छापा मारुन पकडले. त्यांच्याकडून रोखसह दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. सेव्हन हिल येथील हॉटेल रवि किरणमध्ये झन्ना-मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन सायंकाळी छापा मारण्यात आला. या छाप्यात पोलिसांनी अमोल मधुकर शेलार (२२, रा. गणेशनगर), किशोर रमेश उणे (२८, रा. जूना मोंढा, रोहिदासपुरा), रफिक खान नूर खान (३२, रा. हुसेन कॉलनी), विनोद सुधाकर चाकुर (४०, रा. म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप), प्रभाकर किसन रणदिवे (३७, रा. रमानगर, गल्ली क्र. ३), गौतम विश्वनाथ खंदारे (२४, रा. भारतनगर), आकाश काशीनाथ चिकोले (२६, रा. जुना मोंढा, रोहिदासपुरा), भगवान रामप्रसाद अवचार (२८, रा. भवानीनगर), रोहिदास रामचंद्र कस्तुरे (२७, रा. रोहिदासपुरा), हॉटेल मॅनेजर नुरोद्दीन खमरोद्दीन (४०, रा. मिसबाह कॉलनी, पडेगाव) आणि मालक महेश राणा यांना पकडले. त्यांच्याविरुध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker