भिंवडीत इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू

Foto
ठाणे जिल्ह्यातील भिंवडीमध्ये सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून 20 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही इमारत दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील भिंवडीमध्ये एक तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भूईसपाट झाली. भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker