तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणणाऱ्या चाहतीला काय म्हणाला आर. माधवन ? पाहा.

Foto
माधवनचा चित्रपटातील डान्स पाहून यूजरने हा प्रश्न विचारला 
तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला बॉलिवूड अभिनेता म्हणजे आर. माधवन. तो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आर माधवन सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तसेच तो सोशल मीडियाच्या माध्यामातून सतत चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतो. नुकताच एका यूजरने आर. माधवनला लग्नासाठी विचारले आहे. त्यावर त्याने उत्तर देत त्या यूजरला प्रश्न विचारला आहे.
‘हाय आर. माधवन, मी तुझे जुने गाणे पुन्हा पाहत होते. कृपया मला तुझ्याशी लग्न करण्याची परवानगी दे’ असे एका यूजरने ट्विट करत म्हटले आहे. या ट्विटसोबत त्या यूजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ ‘नाला दमयंथी’ या तामिळ चित्रपटातील गाण्याचा आहे. आर. माधवन गाण्यामध्ये अनोख्या स्टाइलमध्ये नाचताना दिसत आहे.त्या यूजरने शेअर केलेला व्हिडीओ पाहून आर. माधवनने देखील उत्तर दिले आहे. त्याने ‘तुला तामिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात वाईट डान्सरशी लग्न करायचे आहे का?’ असा प्रश्न त्या यूजरला विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांमध्ये झालेल्या संवादाची चर्चा सुरु आहे.
त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या या ट्विटवर अनेक कमेंट केल्या आहेत. ‘प्रत्येक हिरोकडे नृत्याचे कौशल्य असलेच पाहिजे असे नसते. आमच्यासाठी तुझ्या चेहऱ्यावरील हास्यच खूप आहे’ असे एका यूजरने कमेंट करत म्हटले आहे.‘नाला दमयंथी’ हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आर. माधवनने ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका तामिळ कूकची भूमिका साकारली आहे. तसेच माधवनसोबत या चित्रपटात गीतू मोहनदास आणि श्रृती मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची निर्मीती कमल हासन यांनी केली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker