मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची आज ठरणार रूपरेषा?

Foto
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आठवड्यात औरंगाबादच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍याची रूपरेषा आज ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद सह कोरोना हॉटस्पॉट असलेल्या नांदेड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांचाही आढावा मुख्यमंत्री घेणार असल्याचे समजते. 
गेल्या 25 जुलै रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शहरात बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्याचवेळी मुख्यमंत्री मातोश्री बाहेर का पडत नाहीत, असा प्रश्न विचारत माध्यमांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. पवारांनी त्यावेळी मुख्यमंत्री कॅप्टन असून एका ठिकाणी बसूनच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतात, असे स्पष्टीकरण दिले. मात्र विरोधकांच्या टीकेमुळे महाविकास आघाडी सरकारला याबाबत पुनर्विचार करावा लागला असे दिसते. त्यानंतर दोनच दिवसांनी शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर पडावे असा सल्ला दिला. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी पुण्याचा दौरा केला आहे. त्याचबरोबर नाशिकसह राज्यातील इतर शहरांच्याही उद्धव ठाकरे दौर्‍यावर जाणार असल्याचे समजते. पुढील चार-पाच दिवसात मुख्यमंत्री औरंगाबादच्या दौर्यावर येणार असल्याचे बोलले जाते. याबाबत आजच औरंगाबाद दौर्‍याची रूपरेषा तयार करण्यात येणार असल्याचे समजते. औरंगाबादसह मराठवाड्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या नांदेड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांचाही आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. सूत्रांच्या मते मुख्यमंत्री औरंगाबाद बरोबरच नांदेड लातूर आदी जिल्ह्यांनाही भेटी देऊ शकतात. मात्र याबाबत अजून निर्णय झालेला नाही असे समजते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker