आर्य चाणक्यची जिल्हास्तरावर निवड

Foto
पैठण, (प्रतिनिधी) _: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आर्य चाणक्य प्रा. विद्यामंदिर, पैठण ने राखली यशाची परंपरा कायम. आर्य चाणक्य विद्या मंदिर पैठण येथे ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातील ३७शाळांनी सहभाग नोंदवला होता.

त्यामध्ये आर्य चाणक्य प्रा. विद्या मंदिर पैठणने तृतीय क्रमांक पटकवला. यामध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषया अंतर्गत शेतकरी व कामगार सुविधा यंत्र हा प्रोजेक्ट बनवला. शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या दृष्टीकोनातून आवश्यक असल्या कारणाने त्या दृष्टीक्षेपात एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अशा समाजउपयोगी प्रयोगाचे सर्वाकडून कौतुक होत आहे.

विषयतज्ञ बाळकृष्ण मुळे व शिवाजी राठोड यांच्या शुभहस्ते विध्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई चे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, स्था. व्य. स. अध्यक्ष पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, शालेय व्य. स. अध्यक्ष शिवाजी मारवाडी, डॉ. राम लोंढे, डॉ. जयंत जोशी, विजय चाटूपळे, डॉ. अशोक पल्लोड, नंदकिशोर मालाणी, किशोर भाकरे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी, आदींनी या प्रयोगाचे यशस्वी सादरीकरणाऱ्या विद्यार्थी शिवेंद्र प्रमोद काकडे मार्गदर्शक शिक्षक -सर्फराज अंबेकर, मनोज शिंगारे यांचे अभिनंदन केले.