व्यावसायिकाचा ५० कोटींचा नुकसान भरपाईचा दावा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): गृहकर्ज प्रकरणात मालमत्तेचा
बेकायदेशीररीत्या ताबा घेऊन आर्थिक आणि व्यावसायिक नुकसान केल्याचा गंभीर आरोप करत चित्रपट निर्माते तथा व्यावसायिक सिद्धार्थ बन्सीलाल जाजू यांनी पिरामल फायनान्स कंपनीविरोधात जिल्हा न्यायालयात ५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. दाव्यानुसार जाजू यांनी २०१३ मध्ये कोटी रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. नंतर तत्कालीन डीएचएफएलकडून सुमारे २.०५ डीएचएफएलचे विलिनीकरण पिरामल हाउसिंग फायनान्समध्ये व्यवसायातील अडचणींमुळे काही आर्थिक अडथळे निर्माण झाले असले तरी आपण नियमित ईएमआय (कर्जाचे हप्ते) भरत होतो. असे असताना संबंधित मालमत्तेचा ताबा १६ मार्च २०२२ रोजी बेकायदेशीररीत्या घेण्यात आला. नोटिसा न देता कर्ज खातें एनपीए घोषित करण्यात आले. दरम्यान, पिरामल फायनान्सला १ मे २०२६ रोजी ५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे नमूद केले आहे. वादीतर्फे अॅड. नरेंद्र बी. गायकवाड काम पाहत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions