सिल्लोड येथे शिवसेना (उबाठा) पक्ष कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): रयतेची राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 5 सिल्लोड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्क कार्यालयात प्रतिमेला पुष्प अर्पण करून पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी छत्रपती 5 शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. 

ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांचे राज्य आणि आजचं राज्य हा किती फरक आहे हे मात्र या ठिकाणी विशद करण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये सर्वधर्मसमभाव, कधीही जातीपातीचे राजकारण त्यावेळी राजांनी केले नाही असा हा महान राजा छत्रपती शिवाजी
महाराज होऊन गेले. आजची राज्याची जी काही जाती-पातीची राजकीय स्थिती येथे निर्माण झाली ती मात्र छत्रपती शिवरायांच्या विचाराला अभिप्रेत राहिलेली नाही या बाबत खंत व्यक्त करण्यात आली.

यावेळी तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, उपजिल्हाप्रमुख संजय काळात्रे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश वराडे तालुका प्रसिद्धीप्रमुख दशरथ सुरडकर, भाऊसाहेब थोरात, रामेश्वर जंजाळ, भास्कर आहेर, नारायण आहेर, दिलीप पारवे, सचिन पाटील, सुभाष वडगांवकर, काकासाहेब विचारे, किशोर लोखंडे, गजानन वाघ, पंढरी डवणे, योगेश डवणे, भूषण जाधव, रामेश्वर काटकर, सागर सोनवणे, कृष्णा हाडोळे, बालाजी पारवे, कैलास चव्हाण, सोमीनाथ मोरे, केशव डवले, आदी शिवप्रेमी उपस्थित होते.