डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महामानवास अभिवादन, विविध उपक्रमांनी जपली सामाजिक बांधिलकी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज सकाळपासूनच भडकल गेट येथे विविध राजकीय पक्ष, संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास असंख्य हातांनी पुष्पहार अर्पण करून विविध संघटना, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली.

आज सकाळपासून महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात भडकल गेट येथे रक्तदान शिबीर, एक वही एक पेन हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी लहान मुलापासून ते वरिष्ठांपर्यत हजारो हातांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विविध प्रकारच्या पुस्तकांचे स्टॉल यावेळी लावण्यात आले. अनेकांनी यावेळी पुस्तक घेऊन वाचनाचे महत्व पटवून दिले. तसेच शहरातील विविध शाळेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार तसेच मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केनेकर, किशोर शितोळे, डॉ. उज्ज्वला दहीफळे, साधना सुरडकर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच विजयरत्न फाऊंडेशनच्या वतीने बाळू रणधरे, अनंत कस्तुरे, संदीप काळे, राकेश साबळे, उत्तम डोंगरे, शंकर गायकवाड तसेच भारतीय बौद्ध महासभेचे रमेश बनसोड, नानासाहेब रणयेवले, एस. टी. काळे, भानुदास निकाळजे, पांडुरंग होरशीळ, बाळासाहेब शेंडगे सह आदींची उपस्थिती होती. यावेळी माधवराव बोरडे प्रतिष्ठानच्या वतीने संविधान उद्देशिकाचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला.

रक्तदान शिबीरातून रक्तदानावर जनजागृती

महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही भडकल गेट येथे रक्तदान शिबीर घेण्यात येतात. यावेळी मिलींद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. दुपारपर्यंत विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

एक वही एक पेन उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आज फेस ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट - फॅम तर्फे एक वही एक पेन उपक्रम राबविण्यात आला. यासाठी मनीष नरवडे, दौलत सिरसवाल, गौतम बावस्कर, विशाल आढाव, संदीप बोर्डे, डॉ. विनीत कोकाटे, डॉ, महेश बनसोडे, पंकज सुकाळे,  शेखर निकम, आदींनी सहकार्य केले.