माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

Foto
दोन दिवसांपूर्वीच करोनामुक्त झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील -निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यात किडनी विकाराने निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर त्यांचे नातू होत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांना करोनाची लागण झाली होती. वयाच्या 91व्या वर्षीही त्यांनी करोनावर मात केली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा करोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना नॉन कोविड वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असतानाच आज पहाटे प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी अंतिम श्वास घेतला. पहाटे 2 वाजून 15 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. किडनी विकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्याहून निलंग्याकडे नेण्यात येणार आहे. त्यानंतर निलंग्यात त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि दुपारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker