मनसेचा गनिमी कावा

Foto
पोलिसांचा बंदोबस्त तोडून मनसे  नेत्यांनी केला लोकलने प्रवास
लॉकडाउनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेने सविनय आंदोलन पुकारले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी गनिमी कावा करत लोकलने प्रवास करून आंदोलन केले आहे.
मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यासाठी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज (21 सप्टेंबर) सकाळीच लोकलमधून विनापरवानगी लोकल प्रवास केला. तर ठाणे स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवलं आणि कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. ठाण्यात पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय नवी मुंबईत मनसेचे उपशहराध्यक्ष निलेश वानखेडे यांच्या ऐरोली मनसे विभाग कार्यकर्त्यांनी वाशी ते ठाणे असा लोकल प्रवास पूर्ण केला. यादरम्यान रबाळे पोलिसांनी ऐरोली स्थानकात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घतलं. मात्र सविनय कायदेभंगाच्या इशार्‍यानंतर मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दादर रेल्वे पोलिस स्टेशन आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ही नोटीस पाठवली आहे. लोकल सेवा सुरु करा नाहीतर सविनय कायदेभंग करावा लागेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. ते म्हणाले की, नोकरदार कल्याण-डोंबिवलीवरुन तीन-तीन तास प्रवास करुन ड्युटीवर जात आहेत, हे सरकारला दिसत नाही. लवकरात लवकर लोकल सुरु करण्याचा निर्णय घ्या, असे देशपांडे यांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker