दुर्गोत्सव २०२५ या अभिनव उपक्रमात जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक लाभार्थ्यांचा सहभाग

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): दुर्गोत्सव २०२५ या अभिनव उपक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून खऱ्या अर्थाने शिवभक्तीचा आणि एकात्मतेचा उत्कृष्ट नमुना घालून दिला आहे. 
आपल्या प्रत्येकाच्या सक्रिय सहभागामुळे आणि एकजुटीच्या भावनेमुळेच अमृत संस्थेचा दुर्गोत्सव आज गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवला गेला आहे. ही केवळ संस्थेची नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाची अभिमानाची कामगिरी आहे. या यशात योगदान देणाऱ्या सर्व शिवभक्त, लाभार्थी, स्वयंसेवक, ग्रामसंस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांचे आम्ही मनःपूर्वक आभार व अभिनंदन व्यक्त करतो. आपल्या सहकार्यामुळेच अमृतचा उपक्रम आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. आगामी काळात आपण सर्वांनी असाच सहभाग राखावा आणि दरवर्षीचा दुर्गोत्सव हा लोकसहभागातून उभा राहिलेला महाराष्ट्राचा उत्सव बनवू या, ही अपेक्षा अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, रामेश्वर साळुंखे, मंजू कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.