मुख्य नाल्यांवरील बांधकामांना लागणार जादा कर; मनपा आयुक्तांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील मुख्य नाल्यांवर करण्यात आलेली अतिक्रमणे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. नाल्यांवरील अशा बांधकामांना आता वाढीव (जादा) कर आकारणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी शनिवारी (दि. २३) नाले सफाईच्या पाहणीदरम्यान प्रशासनाला दिले. याचसोबत घरांचे किंवा दुकानांचे ड्रेनेज थेट नाल्यात सोडणाऱ्यांविरोधातही मोठी दंडात्मक मोहीम उघडण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
मनपा आयुक्त येडगे यांनी शनिवारी शहरातील नाल्यांची
काली महानगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
पाहणी करून मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. कबाडीपुरा येथून पाहणीला सुरुवात झाली. त्यानंतर बारुदगर नाला, संभाजीपेठ तसेच रोपळेकर चौक परिसरातील मुख्य नाल्यांची पाहणी करून तेथील साफसफाई, अतिक्रमण आणि पाणी निचरा व्यवस्थेची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. पाहणीवेळी मुख्य नाल्यांवर मोठ्या प्रमाणात बांधकामे आढळल्याने त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
जलवाहिनी जमिनीखाली टाकण्याचे निर्देश
▶ आयुक्त अमोल येडगे यांनी नाल्यांसोबतच महापालिकेच्या आरोग्य विभागाचीही पाहणी केली. त्यासोबतच रोपळेकर चौकात त्यांना अंतर्गत वसाहतींना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी रस्त्यावरुन टाकण्यात आल्याचे अढळले. त्यावरुन संबंधीत ठेकेदाराला हा प्रकार व्हिडिओ कॉलने दाखवला आणि ती पाईपलाईन तातडीने जमिनीखाली टाकण्याचे निर्देश दिले.
तेव्हा संबंधित इमारतींना महापालिकेने परवानगी दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या बांधकामांमुळे नाल्यांची साफसफाई करताना अडचण येते, हे या भागात पूर्ण क्षमतेने स्वच्छ होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात हे नाले ओव्हरफ्लो होऊन पाणी आणि त्यातील घाण नागरिकांच्या घरांसह दुकानांमध्ये शिरते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नाल्यात
ड्रेनेज वाहिन्या सोडणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांचे ड्रेनेज एसटीपीशी (सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा) जोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. यासाठी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी शहर अभियंता संजय कोंबडे, वॉर्ड अभियंता काझी जावेद, किरण तमनर, जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद यांची उपस्थिती होती
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions









