कार उलटून एक ठार

Foto
चार जण गंभीर जखमी
वैजापूर-शिऊर रोडवर जरुळ फाट्याजवळ घडला अपघात
वैजापूर-शिऊर रोडवर जरुळ फाटा येथील नाना ढाब्याजवळ इर्टिका कार उलटून  एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री हा अपघात घडला असून गाडीचा चुराडा झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इर्टिका कार (क्रमांक एम.एच.16/ए.टी. 8434) शिऊरहून वैजापूरकडे येत असताना जरुळ फाटा जवळील नाना ढाब्याजवळ भरधाव इर्टिका कारच्या  चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. या अपघातात कारमध्ये बसलेले पाच तरुण गंभीर जखमी झाले. अपघातात कारचे बरेच नुकसान झाले.
या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार मोईस बेग व त्यांच्या सहकार्‍यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमी समीर संतोष जाधव (वय 19 वर्षे, रा. दुर्गानगर, वैजापूर), प्रवीण बबन बरबडे (वय 23 वर्षे), नितीन बबन बरबडे (वय 25 वर्षे), शुभम प्रवीण निंबाळकर (वय 23 वर्षे)  आणि अन्य एकजण (सर्व रा. नवजीवन कॉलनी, वैजापूर) यांना उपचारासाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  यातील समीर संतोष जाधव गंभीर जखमी असल्याने त्याला अधिक उपचारासाठी औरंगाबादला घेऊन जात असताना मध्यरात्री 1.10 वाजता रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.  या अपघातात जखमी झालेल्या इतर चौघांवर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker