पैठणमध्ये शिवजयंतीनिमीत्त मिरवणूक

Foto
पैठण (प्रतिनिधी) पैठण शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, नगराध्यक्ष विद्याभूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, महिला आघाडीच्या सौ. पुष्पा गव्हाणे, ज्योती काकडे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा मोरे, नामदेव खरात, बजरंग लिबोरे, अनिल राऊत, नगरसेवक महेश मुंदडा, सुनील रासने, ईश्वर दगडे, विलास अडसूळ, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, राजू गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष  रेखा कुलकर्णी, नगरसेविका वैशाली परदेशी, कविता शिंदे, पंचायत समिती सदस्य उदयसेन काळे नगरसेविका मंगल हिंगे, रूपाली सोनारे, योगिता वरकड, अनिता चीर, गोवर्धन टाक, स्वप्निल साळवे, बाळू माने, प्रशांत जगदाळे, शहादेव लोहारे, अमोल जाधव, विष्णू खंडागळे, गणेश पवार, महेश पवार, हरिभाऊ शेळके, शुभम लोहारे, सुनील हिंगे , तहसीलदार सौ ज्योती पवार, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे राजश्री गायकवाड, पवन सिसोदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते. 
सायंकाळी खंडोबा चौक येथून शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत संभाजी चौक, बस स्थानक चौक, मानि छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणूक देण्यात आली या मिरवणुकी शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष जीतसिंग करकोटक, दत्ता गोर्डे, संतोष राऊत जगदीश गोर्डे, कार समाज संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ इछैय्या, उत्सव समितीचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवभक्त सहभागी झाले होते. निवडणूक शांततेत पार पडली. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता,