ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे निधन

Foto
ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत आणि प्रभावी वक्त्या प्रा. पुष्पा भावे यांचं आज (शनिवारी) मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं, त्या 81 वर्षांच्या होत्या. शिवाजीपार्क स्माशानभूमीत त्यांच्यावर अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आणि पुरोगामी विचारवंत असलेल्या पुष्पा भावे या मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. नाट्य समीक्षक आणि परखड विचारसरणी असलेल्या भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, दलित पँथर, देवदासी मुक्ती अशा चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker