शिवसेना (उबाठा) बैठक गोंधळाच्या वातावरणात

Foto
पैठण, (प्रतिनिधी) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आढावा बैठक अत्यंत बेशिस्त व गोंधळाच्या वातावरणात पार पडली. बैठकीचे स्थळ-वेळ व विषय याबाबत मुख्य पदाधिकारीच अनभिज्ञ होते. उपनेते चंद्रकांत खैरे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा घोळ निस्तरण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशी टोलवाटोलवी करुन पक्षश्रेष्ठींनी काढता पाय घेतला.


उबाठाच्या आढावा बैठकीचा मौधळ, कोणाचे कोणाला ताळमेळ लागेना, नगरपरिषद, जिल्हा परिषद पं. स. निवडणूकीच्या अनुषंगाने मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकी संदर्भात कुणाचे कोणाला ताळमेल लागत नव्हते. उद्धव बाळासाहेब गटाचे तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. परंतु या बैठकी संदर्भात  उद्धव बाळासाहेब गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे, डॉ. सुनील शिंदे. शहर प्रमुख अजय परळकर, माजी नगरसेवक प्रकाश बानोळे यांना कोणताही निरोप मिळाला नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला मोजक्याच पदाधिकाऱ्यांसाठी ही बैठक सिद्धिविनायक नागरी पतसंस्थेत आयोजित करण्यात आली होती परंतु नंतर या बैठकीचे ठिकाण बदलण्यात आले व त्याला आढावा बैठकीचे स्वरूप देण्यात आले.

या आढावा बैठकी संदर्भात दत्ता गोडे, डॉ. सुनील शिंदे, प्रकाश वानोळे यांच्याशी संपर्क साधला असता या बैठकीची आपणास कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तर शहर प्रमुख अजय परकर यांनी सांगितले की ही बैठक फक्त मोजक्या पदाधिकाऱ्यां साठी ठेवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले होते. बैठक फक्त मोजक्या पदाधिकारी साठी असताना मात्र माजी नगराध्यक्ष राखी राजू परदेशी यांनी नेत्यासमोर शक्ती प्रदर्शन केले. 

या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने नंतर ही बैठक आशीर्वाद मंगल कार्यालयात घेण्यात आली या बैठकीस मार्गदर्शन करताना माजी खा चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की नगरपरिषदेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्वांनी एक दिलाने काम करून, प्रचार यंत्रणा राबवावी मतदारांनी मशाल चिन्हाचे बटन दाबावे असे आवाहन केले, यावेळी व्यासपीठावर सुभाष पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनिता आउलवर, प्राध्यापक पद्माकर इंगळे, माजी नगरसेवक राजू इंगळे, अविनाश कुमावत, नागेश खाडे, उपजिल्हा प्रमुख दत्ता गोर्डे, माजी तालुका प्रमुख डॉ सुनील शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक राखी परदेशी, तालुका संघटक स्वाती माने, अॅड किकोर वैद्य, शहर प्रमुख अजय परळकर, माजी नगर सेवक प्रकाश वानोळे, तलिपमा पठाण, शीला कांबळे, शरयू गोसावी, शेषनारायण महाराज, बाळासाहेब घुले यांची उपस्थिती होती.