दुकाने फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सिटीचौक व सिडको पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी मसाले दुकान, बिअर शॉपी आणि पानटपरीला लक्ष्य करत १ लाख ५४ हजारांचा ऐवज चोरून नेला.
विशेष म्हणजे, औरंगपुरा परिसरातील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सिटीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील औरंगपुरा परिसरात शनिवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास तीन चोरट्यांनी वंदना मसाले दुकान फोडून गल्ल्यातील ४० हजारांची रोकड चोरली. त्यानंतर शेजारील अमिती
बिअर शॉपीचेही कुलूप तोडून ८० हजार रुपये पळवले. अवघ्या १५ मिनिटांत दोन्ही दुकाने फोडून चोरटे पसार झाले. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शहरातील मद्य विक्रीच्या दुकानांना लक्ष्य करण्याची महिनाभरातील ही सहावी घटना आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया
सुरू होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
टीव्ही सेंटर परिसरातही चोरट्यांनी पानटपरी आणि बिअर शॉपी फोडून ३४ हजारांचा मुद्देमाल चोरला. याप्रकरणी शाम व्यंकया कुंडमकर (वय ५१, रा. चेलीपुरा) यांनी तक्रार दिली. कुंडमकर यांच्या टीव्ही सेंटर परिसरात गायत्री पानटपरीतून १५ हजार रुपयांचे सिगारेट पाकिटे पळवले. शेजारील लाला बिअर शॉपीचेही कुलूप फोडून १९ हजारांची रोकड पळवली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions