२०० नागरिकांनी घेतला सहभाग
पैठण, (प्रतिनिधी) भारताचे लोहप्रदूस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय छत्रपती संभाजी नगर ग्रामीण अंतर्गत पैठाग पोलीस स्टेशन तर्फे घेण्यात आलेल्या रन फॉर युनिटी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला जवळपास २०० नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत बरिष्ठ गटातून अजय दिलीप लखोटिया प्रथम, जनार्दन गरसुडे द्वितीय, अॅड प्रवीण बड़े तृतीय येण्याचा बहुमान पटकावला.
कुमार गटातून रोहिदास कारभारी कोलते प्रथम, भागवत आप्पासाहेब नाटकर नाटकरवाडी द्वितीय, प्रतीक दीपक नवगिरे चांगतपुरी तृतीय येण्याचा बहुमान पटकावला. तर मुली मधून समृद्धी भाऊ उचके इंदिरानगर पैठण प्रथम, वैष्णवी प्रवीण कुंढारे कहार गल्ली पैठण द्वितीय, गीता पांडुरंग विरळ रामनगर तृतीय क्रमांक पटकाविला आहे
विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली.















