पुणेरी अधिकाऱ्याची अशीही क्रीडा ; खेळाडू तणावात

Foto
गेल्या आठवड्यात शहरात येऊन गेलेल्या पुणेरी अधिकाऱ्याच्या क्रीडांनी खेळाडू त्रस्त झाले आहेत. वेगवेगळ्या नावांनी थेट खेळाडूंच्या मोबाईलवर कॉल करत येऊन भेटा नसता, कारवाई करू ! अशी थेट धमकी दिली गेल्याने मानसिक तणावात आलेल्या खेळाडूंनी क्रीडा उपसंचालकांकडे धाव घेतली. मात्र अजूनही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही.
राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना आणि शहर रेड झोन मध्ये असताना पुण्याचे एक क्रीडा अधिकारी शहरात तळ ठोकून होते. नोकरीत असलेल्या खेळाडूंना तपासणीच्या नावाखाली या अधिकाऱ्याने प्रचंड मानसिक त्रास दिला. संसर्गाच्या काळातही मायेच्या लोभाने येऊन भेटा असा निरोप या खेळाडूंना दिला गेला. त्यामुळे खेळाडू चांगले धास्तावले. सचिन राठोड या खेळाडूने तर थेट क्रीडा मंत्र्यांनाच पत्र लिहून या अधिकार्‍यांपासून आम्हाला वाचवा असे आर्जव केले. अमोल सांबरे याला वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून सुहास पाटील नावाच्या क्रीडा अधिकाऱ्याला भेटण्याचे सांगितले गेले. नसता तुमच्या नोकरीवर गदा येईल, अशी धमकीही मिळाली. त्यामुळे खेळाडू मानसिक तणावात आले व त्यांनी उपसंचालकांकडे तक्रार केली.
  कारवाई करणार कोण ?
दरम्यान सुहास पाटील नावाचा पुणेरी क्रीडा अधिकारी शहरात तळ ठोकून होता. खरेतर संसर्गाच्या काळात पुण्याहून शहरात अधिकारी येतो हे जरा विचित्र वाटते. त्यातही या अधिकाऱ्याने शहरात तळ ठोकून खेळाडूंना त्रस्त केले. या अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी खेळाडूंनी थेट क्रीडा मंत्री तसेच उपसंचालकांकडे केली होती.मात्र अजूनही या अधिकार्‍यावर कारवाई झाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker