: सिल्लोड, (प्रतिनिधी) : सलग सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील विविध गावांतील शेतशिवारात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सहका-यांसमवेत लिहाखेडी-मांडणा शिवार येथे भाजपा प्रदेश चिटणीस तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा नेते सुरेश भाऊ बनकर यांनी बांधवार जाऊन शेतकरी बांधवांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली असून, संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून चर्चा केली.
तसेच येत्या २ ते ३ दिवसांत शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई महायुती सरकारकडून देण्यात येणार आहे असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात आम्ही सर्वजण सोबत आहोत असा विश्वास सुद्धा यावेळी दिला. याप्रसंगी भाजपा भवन मंडळ तालुकाध्यक्ष एकनाथ हिवाळे, चेअरमन रामेश्वर डापके, भाजपा भवन मंडळ सरचिटणीस दिपक कळात्रे, भाजपा भवन मंडळ तालुका उपाध्यक्ष हरीदास साखळे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
मदत दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार :
सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची आम्ही स्वतः पाणी करून महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या मदतीने पंचनामे करून घ्यायला लावले. त्या नुकसानीची मदत येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, या आठवड्यातही शेतमालाचे सिल्लोड व सोयगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत. आम्ही पुन्हा नुकसान भरपाईची मागणी शासन दरबारी करणार आहोत.
- सुरेश बनकर, भाजप प्रदेश सचिव.















