‘जय श्रीकृष्ण’च्या गजराने भक्‍तीमय झाले शहर

Foto
 जय श्री कृष्ण, राधे राधे म्हणत आज सकाळपासूनच शहरात ठिक-ठिकाणी पारंपरिक पद्धतीने श्री कृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू करण्यात आली. यावेळी महानुभव आश्रम श्री कृष्ण मंदिरासह घरोघरी श्री कृष्णाचा पाळणा सज्ज करण्यात आला. यावेळी राधा कृष्णच्या जयघोषात वातावरण भक्‍तीमय झाले. 
दरवर्षी मोठ्या उत्साहात श्री कृष्ण जन्माष्टमीची तयारी केली जाते. शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रोषणाई, सजावट करून भजन, कीर्तनासह आदी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल दिसून येते. याशिवाय सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपत एकत्रितपणे श्री कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सकाळपासूनच दरवर्षी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. यंदाही श्री कृष्ण जन्माष्टमीची धूम कायम असून यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने एकत्रितपणे श्री कृष्ण जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले नाही. केवळ घरोघरी राधे कृष्णचा गजर करत भगवान श्री कृष्णाची पूजा, महाभिषेक करून आरती करून श्री कृष्णाचा सकाळपासूनच गजर केला जात आहे. यावेळी कृष्णाचा पाळणा सजवून, रांगोळ्या काढून पारंपरिक पद्धतीने आज रात्री श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी तयारी करून सज्ज झाले आहेत. तसेच शहरातील महानुभाव आश्रम श्री कृष्ण मंदिराच्या वतीने श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दरवर्षी मोठ्या उत्साहात तयारी केली जाते. 
बाहेरून कारागीर येऊन श्री कृष्णाचा देखावा तयार करण्यासाठी महिनाभरापासून मेहनत घेतात. हा देखावा पाहण्यासाठी शहरातीलच नव्हे तर जिल्हाभरातील नागरिक पाहण्यासाठी गर्दी करतात. परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने देखावा तयार केला नाही. केवळ आज सकाळी राजेंद्र खंडेलवाल यांच्या हस्ते श्री कृष्णाचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गीतापाठ कार्यक्रम घेऊन आज रात्री केवळ पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पारंपरिक पध्दतीने जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी झुला सजावट, रोषणाई करण्यात आली आहे. अशी माहिती पुजारी विजयराज कपाटे यांनी दिली. यासाठी अध्यक्ष आत्याबाई शास्त्री, संतोषमुनी शास्त्री, साईराज कपाटे, अजय कपाटे, अक्षय कपाटे सह आदींनी सहकार्य केले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker