आता रोडरोमिओंची खैर नाही ; मुलींना छेडले तर झुमक्यातून निघणार ‘बुलेट’

Foto
औरंगाबाद :-  महिलांची सुरक्षा अत्यंत आधुनिकपणे वाढविण्याच्या दृष्टीने वाराणसी येथील एका तरुणाने अनोखा शोध लावला आहे. शाम चौरसिया नावाच्या या तरुणाने असा झुमका तयार केला आहे की ज्यातून मिर्चीची गोळी बाहेर येईल आणि छेडणार्‍याला निशाणा बनवून त्याला पळवून लावता येईल.
वाराणसीच्या अशोका इन्स्ट्यिूटमध्ये रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे प्रभारी म्हणून काम पाहणारे शाम चौरसिया यांनी हे सुंदर शस्त्र तयार केले आहे. ते म्हणाले की, हा झुमका महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांसह  विद्यार्थिनींच्या दृष्टीनेदेखील अत्यंत फायदेशीर ठरणारा आहे. देशात महिलांसोबत होणारी छेडछाड, दुष्कर्म रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून रिसर्च करीत असताना झुमक्याची ही ‘आयडिया’ गवसली आणि महिलांच्या दृष्टीने ती एखाद्या कवचाप्रमाणे काम करेल असे वाटते. कानात घालण्यात येणारे हे झुमके महिलांचे संरक्षण करेल.
का स्मार्ट आहे हा झुमका
हा झुमका महिलांशी गैरवर्तन करणार्‍यांना रोखण्यात स्मार्ट आहे. हा झुमका फक्‍त दिसण्यातच स्मार्ट नाही तर कामदेखील स्मार्ट करतो. चौरसिया म्हणाले की, हे एक  ‘यू टीचिंग डिव्हाईस’ आहे. दिसताना ते महिलेच्या दागिण्यासारखे दिसते. पण कोणी गैरवर्तन केल्यास मोठा आवाज करण्याची आणि लाल किंवा हिरवी मिर्ची उडवण्याची क्षमता त्यात आहे. या झुमक्याला बटन लावण्यात आले आहे. ते दाबताच मिर्चीची गोळी झाडली जाते. याचे वजन अवघे 45 ग्रॅम आणि रुंदी 3 इंच आहे.   इअररिंगमध्ये 3 इंच लांब आणि 5 मि.मी. फोल्डिंग बॅरल आहे. या डिव्हाईसमध्ये 3.70 व्होल्टची बॅटरी लावण्यात आली असून त्याला दोन स्वीच असून त्यापैकी 1 ट्रिगल तर दुसरा 112 आणि 10 नंबरला कॉल करणारे स्वीच आहे.

पोलिसांनाही मिळते सूचना
या डिव्हाईसची खासियत म्हणजे महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या महिलेने बटन दाबले तर थेट 112 आणि 100 क्रमांकावर कॉल लागला जातो. 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker