विनाकारण आणि बेकायदा धावणाऱ्या वाहनांवर शहर वाहतूक पोलिसांनी आज जोरदार कारवाई केली. दिवसभरात तब्बल १९९ वाहनांवर कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात आली. सिडको विभागात सर्वाधिक ७८ वाहने ताब्यात घेत दंड आकारण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येत आहे. दुचाकीवर डबल अथवा ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्याचबरोबर नियम मोडणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला. पोलिसांनी कलम १८८ प्रमाणे शहरात १६ गुन्हे दाखल केले आहेत.
वाहतूक पोलिसांनी सिडको विभागात सर्वाधिक ७८ वाहन धारकांवर कारवाई केली. वाळूज विभागात ५६, छावणी ४३ तर शहर विभागात २२ वाहनधारकांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. लॉक डाऊन च्या काळात पोलिसांनी आतापर्यंत १५३६ गुन्हे दाखल केले आहेत.












