औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर संपता संपेना. आज सकाळी आलेल्या अहवालानुसार २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. १२५ पुरूष, ७५ महिला आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२४३ वर गेली आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार २०० रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२४३ वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी २९६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २९९५ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
शहरातील १४२ रुग्ण
आजच्या अहवालानुसार शहरात १४२ रुग्ण आढळून आले. त्यात घाटी परिसर १, लोटाकारंजा १, हडको १, जय भवानीनगर १, जाधववाडी २, राजनगर, मुकुंवाडी १, एन एक, सिडको १, तारक कॉलनी ३, शिवशंकर कॉलनी २, उस्मानपुरा १, कांचनवाडी २, सिडको, एन चार १, जवाहर कॉलनी १, हनुमाननगर १०, विशालनगर १, शिवाजीनगर ३, सातारा परिसर ५, गजानननगर ३, देवळाई रोड १, अलमगीर कॉलनी २, सादातनगर २, बायजीपुरा १, रेहमानिया कॉलनी २, कोहिनूर कॉलनी ४, विठ्ठलनगर ३, पहाडसिंगपुरा २, सिडको एन अकरा ३, हर्सुल २, एकतानगर ४, पडेगाव २, जय भवानीनगर ७, हिंदुस्तान आवास २, भारतमातानगर १, रायगडनगर २, नवजीवन कॉलनी १, पवननगर १, शिवछत्रपतीनगर, एन बारा १, सारा परिवर्तन १, जाधववाडी १, एन अकरा २, रघुवीरनगर, जालना रोड १, एन चार सिडको १, हनुमाननगर, गारखेडा ३, मुलची बाजार, सराफा रोड १, गारखेडा परिसर १, भारतनगर १, रामनगर १, बजरंग चौक, एन सहा २, मुकुंदवाडी १, शांती निकेतन कॉलनी १, संभाजी कॉलनी, एन सहा ५, एन दोन, ठाकरेनगर २, लक्ष्मीनगर, गारखेडा ४, जरीपुरा २, भाग्यनगर १, खोकडपुरा ४, चेलिपुरा १, सेव्हनहील १, एन नऊ १, न्यू श्रेयनगर १, बजरंग चौक १, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी १, एन आठ, सिडको १, मिलेनियम पार्क १, छावणी १, छत्रपतीनगर, सातारा परिसर ७, कोकणवाडी १, हडको, जळगाव रोड १, नारळीबाग २, नाईकनगर, देवळाई १, मिसारवाडी १, चिकलठाणा १, इतर १ या भागातील रुग्ण आढळून आले आहे.
ग्रामीण भागातील ५८ रुग्ण
आजच्या अहवालानुसार कन्नड १, कोलगेट कंपनी जवळ, बजाजनगर १, श्वेतशिल्प सोसायटी बजाजनगर १, सिंहगड सोसायटी बजाजनगर ३, दिग्विजय सोसायटी बजाजनगर १, लोकमान्य चौक, बजाजनगर १, कृष्ण कोयना सोसायटी बजाजनगर १, म्हाडा कॉलनी, बजाजनगर ३, छावा सोसायटी बजाजनगर १, एसटी कॉलनी, बजाजनगर १, सिडको महानगर, बजाजनगर १, अनिकेत सोसायटी बजाजनगर ३, वाळूज महानगर २, शरणापूर ३, बजाजनगर ३, शांतीनगर, वडगाव १, क्रांती नगर, वडगाव कोल्हाटी २, विशाल मार्केट जवळ, सिडको महानगर २, साऊथ सिटी, बजाजनगर ४, सारा सार्थक सोसायटी बजाजनगर २, जय भवानीनगर, बजाजनगर २, अल्फान्सो शाळेजवळ, बजाजनगर २, साजापूर १, भवानीनगर, म्हाडा कॉलनी, बजाजनगर १, माऊलीनगर, सिडको, बजाजनगर १, चित्तेगाव १, टिळकनगर, कन्नड १, माळुंजा ४, रांजणगाव ४, दर्गाबेस वैजापूर ४ या भागातील कोरोनाबाधित आहेत.











