कुरिअर कंपनीला 27 लाखाला गंडा
गाडीचा अपघात झाल्याचा बनाव करून कुरिअर कंपनीच्या कर्मचर्यानीच व्यवहाराचे 27 लाख रुपये हडपल्याचे समोर आले आहे.सिटीचौक पोलिसांनी 22 लाख रुपये जप्त केले आहे.उर्वरित पाच लाखाचा शोध पोलीस घेत आहे.
रमेश ठक्कर यांचे क्विक कुरिअर नावाची कंपनी आहे.बीड येथील कार्यालयाचा कारभार श्रीकांत संदेश धिवरे हा सांभाळतो मात्र त्यानेच साथीदार शिवाजी दादाहरी जोगदंड यांच्यासह कट रचून कंपनीच्या व्यवहाराचे 27 लाख रुपये 11 जुलै रोजी मध्यरात्री अपघात झाल्याचा बनाव करून हडपले होते.या प्रकरणी पोलिसांनी श्रीकांत आणि शिवाजी या दोघांना अटक केली.श्रीकांत याच्या ताब्यातून या अगोदर 18 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. तर शिवाजी जोगदंड याने लपवलेले 4 लाख आज पोलिसांनी जप्त केली आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी पवार, उप निरीक्षक प्रवीण पाथरकर,हवलंदार अप्पा साहेब देशमुख,दिलीप मोदी,तायडे ,दुबे यांच्या पथकाने केली














