जिल्ह्यात 4302 रुग्णांवर उपचार सुरू, 36 रुग्णांची वाढ

Foto
आज जिल्ह्यातील ३६ रुग्णांची वाढ
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ही १०८३९ वर गेली आहे. 

आज सकाळी ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कारोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या १०८३९ एवढी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१४१ एवढी आहे. आजपर्यंत एकूण  ३९६ जणांचा मृत्यू झाल्याने एकुण ४३०२ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
 शहरात आढळले ६ रुग्ण 
शहरात ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जामा मस्जिद परिसर १, लक्ष्मीनगर २, देवगिरी कॉलनी १, राजीव गांधीनगर १, गुरूदत्तनगर गारखेडा १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
 ग्रामीण भागातील १९ रुग्ण
ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बकवालनगर वाळुज १, पाचोड १,  साबणे टॉकीज परिसर, गंगापुर ५, लासुर स्टेशन १,  शिरसगांव १, मेहबुबखेडा १,  रेणुकानगर, अजिंठा १, आंबेडकरनगर, वैजापुर १, गोल्डनगर वैजापुर १,  एनएमसी कॉलनी वैजापुर १, वैजापुर ५  या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
 चेक पोस्ट वर ११ रुग्ण
चेक पोस्टवर ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 
सुधाकरनगर १,  मिटमिटा ३, जाधववाडी २,  सिध्दार्थनगर १, हर्सुल १, बालाजीनगर १,   बजाजनगर २ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.