विहामांडवा येथे चोरांचा धुमाकूळ; दोन दुकाने फोडली

Foto
 चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घालत कापड दुकान,मेडिकल फोडून सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे तर बंद पडलेल्या जिनिग मध्ये आसरा घेतलेल्या मेंढपाळांच्या 22 मेंढ्या चोरल्याची घटना आज पहाटे पाचोड मधील विहामांडवा येथे उघडकीस आली आहे.यामुळे व्यापारी वर्गात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाचोड पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या विहामंडवा भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे. गावातच संजय गाभूल यांची माऊली ड्रेसेस नावाने रेडिमेड कपडे विक्रीची दुकान आहे.नित्य प्रमाणे त्यांनी रात्री दुकान बंद केली. मात्र पहाटे त्यांच्या दुकानाचे लोखंडी शटर उचकटलेले दिसले. त्यांनी आत मध्ये जाऊन पाहिले आसता दुकानातील माल अस्ताव्यस्त अवस्थेत होता.त्यांनी या बाबत पाचोड पोलिसांना कळविले असता दुपार पर्यंत पोलीस पंचनामा करीत होते.सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी वर्तविला आहे. चोरीचा नेमका आकडा मात्र दुपार पर्यंत स्पष्ठ होऊ शकला नाही.तर चोरट्यानी शेजारील दुसरे मेडिकल देखील उचकटले तेथून काही चिल्लरच चोरट्यानी लंपास केली तर.गावातच एक बंद जिनिग आहे तेथे पावसामुळे एका मेंढपाळाने आश्रय घेतला होता.त्या मेंढपाळाची 22 मेंढ्या देखील चोरीला गेली आहे.
मोठी बाजारपेठ असलेल्या विहामंडवा पोलीस चौकी मध्ये केवळ 3 पोलीस आहेत.  त्यामधील दिवस-रात्र पाळी असे एक वेळेस एकच पोलीस उपलब्ध असतात त्यामुळे चोरांचे फावते.पोलिसांची संख्या वाढविण्यात यावी. दोन वर्षात 30 ते 35 वेळा अशा चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. 
राजेंद्र पन्हाळकर