घाटीतून पळाला...अखेर अडकला

Foto
हत्येच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडी दरम्यान घाटीत उपचार सुरू असताना 19 जूनच्या पहाटे पळून गेलेल्या आरोपीच्या जवाहरनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. इम्रान बेग आमीर बेग वय-25 (रा.काबरानगर, गारखेडा परिसर) असे  पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, इम्रान वर हत्येचा आरोप आहे.तो न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात असताना त्यास छातीत दुःखद असल्याने त्यावर घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक-13 मध्ये उपचार सुरू होते.उपचार दरम्यान 19 जून रोजीच्या पहाटे 5.55 मिनिटांनी त्याने पोलिसांची नजर चुकवत  घाटाच्या वॉर्डातून पलायन केले होते.त्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तेंव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.जवाहरनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना तो जवाहरनगर भागात आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. खात्रीलायक माहिती वरून पाटील यांनी शशिकांत तायडे,सय्यद फहिम व  पथकासह सापळा रचून आरोपी इम्रानच्या मुसक्या आवळल्या आहे.