'औरंगाबाद कलेक्टरकडून सूचना' असा मजकूर असलेला चुकीचा संदेश काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जात आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत. मात्र हा चुकीचा संदेश व्हायरल करून लोकांमध्ये गैरसमज पसरवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर संदेश कोणत्याही ग्रुप वर व्हायरल करू नये, नसता कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संदेश अथवा माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे दिली जाते. मात्र काही व्हाट्सअप ग्रुपवर औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्या सुचना असे सांगत शेजाऱ्यांशी संबंध ठेवू नका, वृत्तपत्र वृत्तपत्र बंद करा, बेकरी पदार्थ खाऊ नका अशा आशयाचे मेसेज फॉरवर्ड होत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने प्रसारित होणारे हे चुकीचे मेसेज नागरिकांत संभ्रम निर्माण करणारे आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने याची दखल घेतली असून असे संदेश कुणी फॉरवर्ड केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.